नवी दिल्ली : रिलायन्स जिओमुळे मोबाईल कंपन्यांची उडालेली धांदल अजूनही कमी झालेली नाही. ग्राहक टिकवण्यासाठी या कंपन्या खूप दबावाखाली आहेत. त्यासाठी या कंपन्या नेहमी नव्या नव्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच दरम्यान व्होडाफोन इंडियानं एक नवीन ऑफर जाहीर केलीय. यामध्ये ग्राहकांना २९ रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड थ्रीजी - फोरजी डाटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना प्रति तास ६ रुपयांपेक्षाही कमी किंमतीत अनलिमिटेड डाटा उपलब्ध होतोय. हा डाटा केवळ रात्री १.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत वापरता येणार आहे. 


याची तुलना जिओशी केली तर कंपनी १० रुपये प्रतिदिनच्या हिशोबानं १ जीबी डाटा उपलब्ध करून देतेय. शिवाय व्होडाफोननं एक सुपरनाईट अवरचीही घोषणा केलीय. यामध्ये युझर्सनं केवळ ६ रुपये प्रति तास थ्रीजी-फोरजी डाटा प्लान खरेदी करू शकता. ही ऑफर दिवसातून केवळ पाच वेळा खरेदी केली जाऊ शकते. 


ही ऑफर अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला *444*4# USSD कोड डायल करावा लागेल.