EV With Range Of 477 Km In One Charge: ऑटोमोबाईल मार्केटमध्ये हल्ली दर महिन्याला नवीन इलेक्ट्रीक कार (EV Market) दाखल होताना दिसतात. भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रीक कार सेक्टरमध्ये अनेक कंपन्या सध्या स्पर्धेत असतानाच आता यात आणखीन एका कंपनीची भर पडणार आहे. जगातील सर्वात सुरक्षित कार निर्माण केल्याचा दावा करणाऱ्या वॉल्वो कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रीक कार उतरवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ही कार एसयुव्ही सेगमेंटमधली असेल असं जाहीर केलं आहे. ही कार 14 जून रोजी लॉन्च होणार आहे. या कारचा फटका ह्युंडाईच्या आयोनिक 5 (Hyundai Ioniq-5) या कारला बसणार आहे. प्रमिअर सेगमेंटमधील ह्युंडाईच्या या कारला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच आता वॉल्वो कंपनी सी 40 रिचार्ज ईव्ही (Volvo C40 Recharge EV) लॉन्च करत आहे. ही कार ह्युंडाईच्या कारला टक्कर देणार आहे.


यापूर्वीही भारतीय बाजारात आणलेली कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी वॉल्वो कंपनीने 2022 मध्ये एक कार भारतीय बाजारपेठेत उतरवली होती. या कारचं नाव एक्स 40 रिचार्ज असं होतं. आता याच गाडीचं इलेक्ट्रीक व्हर्जन सी 40 नावाने लॉन्च करण्यात आली आहे. या कारची रेंज सध्या बाजारात असलेल्या कोणत्याही कारपेक्षा जास्त असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये अनेक भन्नाट फिचर्स असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.


एकदा चार्ज केली की 477 किमी


वॉल्वो सी 40 रिचार्ज या कारमध्ये कंपनीने 79 किलोवॉटचं बॅटरी पॅक दिलं आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 477 किलोमीटरपर्यंत धावू शकते. अर्थात शहरामध्ये चालवताना ही रेंज कमी होईल हे सहाजिक आहे. कंपनीने बॅटरीच्या चार्जिंग टाइमसंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र काही ऑटोमोबाईल सेक्टरमधील वेबसाईट्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या कारची बॅटरी 8० टक्के चार्ज होण्यासाठी केवळ अडीच तास लागतील.


फिचर्स आणि किंमत


कारचं डिझाइनही आकर्षक आहे. कारचं फ्रण्ट ग्रील काढून टाकण्यात आलं असून त्याजागी क्लोज पॅनल वापरण्यात आलं आहे. हॅमर एलईडी हॅण्डलॅम्प देण्यात आला आहे. तसेच टेल लॅम्पमध्ये व्हर्टिकल एलईडी लॅम्पचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये मुबलक केबिन स्पेस आहे. 14 इंचांचा इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 5 ड्राइव्हिंग मोड्स, हरमन कारडॉनची म्यूझिक सिस्टीम प्रीइन्स्टॉल देण्यात येणार आहे. एका अंदाजानुसार कारची किंमत किंमत 60 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.