मुंबई : वोल्वोची बहुप्रतिक्षित 'वोल्वो एक्ससी ६०' ही लक्झरी कार भारतात अखेर लॉन्च झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वोल्वो एक्ससी ६०'मध्ये १९६९ सीसीचं ४ सिलिंडर ट्विन टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिन लावण्यात आलंय. यामध्ये ४००० आरपीएम वर जास्तीतजास्त  २३३ बीएचपीची पॉवर आणि ४८० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट केला जातो. याच्या इंजिनला ८ स्पीड गिअरट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडण्यात आलंय. 


४ झोन क्लायमेट कन्ट्रोल, एअर सस्पेन्शन सिस्टम, १५ स्पीकर ऑडिओ सिस्टम, ९ इंच स्क्रीन, ब्लॅक सॉफ्ट टच डॅशबोर्ड, पॅनोरॉमिक सनरुफ अशी फिचर्स या गाडीत देण्यात आलीत. 


या गाडीत इको, कम्फर्ट, ऑफ रोड, डायनॅमिक आणि इंडिव्हिज्युअल  अशी पाच ड्राईव्ह मोडस् उपलब्ध आहेत. 


सुरक्षेसाठी या गाडीत क्रूज कंट्रोल, पायलट असिस्टम, लेन किपिंग अॅड, पार्क पायलट असिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा व्ह्यू, हिल स्टार्ट असिस्ट असे फिचर्सही देण्यात आलेत.


भारतात ही गाडी आउडी क्यू ५, बीएमडब्ल्यू एक्स ३, मर्सिडीज बेंझ जीएलसी, जॅग्वार एफ पेस अशा गाड्यांना जोरदार टक्कर देणार आहे.  


या कारची भारतातील एक्स शोरुम किंमत आहे फक्त ५५.९० लाख रुपये...