मुंबई : प्रायव्हेट चॅट सुरक्षित रहावं यासाठी व्हॉट्स ऍप सध्या एका भन्नाट फिचरवर काम करतंय. त्यामुळे एखाद्या युजरशी तुम्ही बोलत असताना त्याने स्क्रिनशॉट घेतल्यास आता तुम्हाला नोटीफिकेशन येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चॅटिंग करण-या दोन युजरपैकी एका युजरनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर व्हॉट्सऍप समोरच्या व्यक्तीला याबाबत नोटिफिकेशन पाठवणारेय. 


समोरच्या व्यक्तीनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर यापुढे तीन ब्लू टिक दिसतील.


----


WhatsApp चं नवीन फीचर! आपोआप डिलीट होईल प्रायव्हेट चॅट, जाणून घ्या कसं?


मुंबई : सध्या आपल्याला कोणासोबत ही संभाषण करायचे झाले तरी आपण डिजिटल पद्धतीनेच ते करतो. बऱ्याचदा असे ही होते की, आपण आपल्या समोर असलेल्या व्यक्तीसोबत देखील समोरासमोर संभाषण न करता डिजिटल पद्धतीने करतो.


परंतु जी मज्जा समोरासमोर गप्पा मारण्यात आहे, ती डिजिटल पद्धतीने गप्पा मारण्यात नाही. तसेच समोरासमोर बोललेली गोष्ट ही त्या दोन व्यक्तींमध्येच राहते.


परंतु तिच गोष्ट जर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एकमेकांना सांगितली, तर त्याचा पुरावा मागे राहतो. ज्यामुळे कोणतीही तिसरी व्यक्ती त्याला वाचू शकते.


त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती लोकं मनमोकळे पणाने बोलत नाहीत. आपण संभाषण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात लाखोंपेक्षा जास्त युजर्स आहेत.


त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि नवनवीन फीचर्स अ‍ॅड करत असतो.


आता व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे, ज्यामुळे यापुढे युजर्सला त्यांचा गप्पा सुरक्षित ठेवण्याचा पर्याय मिळत आहे.


व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे की, अ‍ॅपवर किती काळ मेसेज राहायचे, हा तुमचा निर्णय असावा.


जेव्हा वापरकर्ते कोणालाही संदेश पाठवतात किंवा प्राप्त करतात तेव्हा त्या संदेशांची डिजिटल प्रत तयार केली जाते आणि आम्हाला त्याबद्दल माहिती देखील नसते.


म्हणूनच व्हाट्सएपने गेल्या वर्षी ग्राहकांसाठी डिसअपीयरिंग मेसेज फीचर तसेच व्ह्यू वन्स फीचर आणले जेणेकरुन वापरकर्त्याने फोटो किंवा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो लगेच गायब होईल.


आता WhatsApp ने एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामुळे यूजर्सना त्यांच्या मेसेजवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक पर्याय मिळत आहेत.


'डिफॉल्ट डिसपिअरिंग मेसेज आणि मल्टिपल ड्युरेशन्स' या फीचर्सच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअ‍ॅपमध्ये किती काळ मेसेज ठेवावा हे ठरवू शकतात.