मुंबई : तुम्हांला मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स बघायचे असतील तर ते वेळीच शोधणे आणि मिळवणे कठीण होऊन बसतं. 
मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स शोधायचे असतील तर आता ही प्रक्रिया सोप्पी होण्याची शक्यता आहे. कारण एका अ‍ॅपमुळे आता जुने कॉल डिटेल्स शोधणं सहज शक्य होणार आहे.  


फ्री डाऊनलोड   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अ‍ॅपमुळे तुम्हांला 7-30 दिवस जुने कॉल डिटेल्स शोधणं शक्य होणार आहे. पीडीएफ फाईलच्या स्वरूपात तुम्हांला डिटेल्स मिळतील. 
तुम्ही जो इमेल अ‍ॅपमध्ये द्याल त्याच इमेल आयडीवर कॉल डिटेल्स दिले जातात. गूगल प्ले स्टोअरमध्ये हे अ‍ॅप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. अवघ्या दोन मिनिटांत तुम्हांला परवानगी मिळताच कॉल डिटेल्सही मिळतील. 


अ‍ॅप अशाप्रकारे काम करते 


फोनमध्ये अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर ज्या क्रमाकांचे तुम्हांला कॉल डिटेल्स हवेत तो नंबर एन्टर करा. काही प्रायव्हसी डिटेल्स घेतल्यानंतर त्यामध्ये तारीख, क्रमांक, कॉल ड्युरेशन यासारखे डिटेल्स दिले जातात. त्यामुळे युजर्सना 7-30 दिवसांपर्यतचे कॉल डिटेल्स मिळतात. 


अ‍ॅप कोणते ? 


mubble app नावाचे हे फ्री अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आहे.  4.49MB च्या अ‍ॅपला Recharge Plans & Prepaid Bill या नावानेही ओळखले जाते. 4.2 पेक्षा अधिकच्या अ‍ॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग  सिस्टीममध्ये काम करते. अ‍ॅप डेव्हलपरच्या दाव्यानुसार Airtel, Vodafone, Idea, BSNL, Aircel, Reliance JIO,Docomo शिवाय इतरही टेलिकॉम कंपन्याच्या क्रमांकांचे डिटेल्स काढले जाऊ शकतात.  


बॅलेन्स आणि डाटा चेक करा  


अ‍ॅपचा वापर करून युजर्स बॅलन्स आणि डाटा चेक करू शकतात. लो डाटा बॅलेन्स असल्यास रिमाईंडर दिला जातो. त्यावरून तुम्ही कोणत्याही मोबाईल क्रमांकाला रिचार्ज करू शकता.