1st आणि 3rd पार्टी इंश्युरन्समध्ये काय आहे फरक? याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या
तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर त्याचा विमा असणं आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांनी पकडलं तर दंड झालाच समजा.
Which is best vehicle insurance Policy: तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर त्याचा विमा असणं आवश्यक आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे रस्त्यावर विमा न घेता वाहन चालवणे तुम्हाला महागात पडू शकते. वाहतूक पोलिसांनी पकडलं तर दंड झालाच समजा. विमा तुमच्या वाहनाचं संरक्षण करतं, त्यामुळे विमा असणं अनिवार्य आहे. वाहनाचा अपघात किंवा चोरी झाल्यास विमा खूप उपयोगी ठरू शकतो. पण विमा घेताना अनेकदा 1st पार्टी की 3rd पार्टी याबद्दल विचारलं जातं. त्यामुळे आपल्याला संभ्रम पडतो की नेमका कोणता विमा घेतला तर फायदेशीर ठरेल. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला दोन्ही विम्यातील अंतर सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला योग्य विमा निवडता येईल.
फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पार्टी इंश्युरन्स म्हणजे काय?
इंश्युरन्स पॉलिसीच्या भाषेत सांगायचं तर, वाहन मालकाच्या नावाने घेतलेला विमा म्हणजे फर्स्ट पार्टी . तर वाहन इंश्योरेंस कंपनीला सेकंड पार्टी संबोधलं जातं. तर थर्ड पार्टी म्हणजे एखाद्या अपघातात गाडीचं नुकसान किंवा एखाद्या व्यक्तीला इजा झाली अशी व्यक्ती असते.
फर्स्ट पार्टी इंश्युरन्स
फर्स्ट पार्टी इंश्युरन्स पॉलिसी धारकाच्या वाहनाच्या संरक्षणासाठी असते. कोणतीही नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा वाहन चोरी झाल्यास वाहन मालक विमा कंपनीकडे दावा दाखल करू शकतो. यामध्ये विमा कंपनी थर्ड पार्टी क्लेम देखील कव्हर करते. उदाहरणार्थ, जर तुमच्या वाहनामुळे दुसरी व्यक्ती किंवा त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असेल, तर कंपनी तुमच्या वतीने दावा निकाली काढेल. झिरो डेप्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही वर्षातून दोनदा क्लेम करू शकता. नवीन नियमांनुसार, विम्याशिवाय गाडी चालवल्यास 2,000 रुपयांपर्यंत दंड किंवा 3 महिन्यांची तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
थर्ड पार्टी इंश्युरन्स
थर्ड पार्टी इंश्युरन्समध्ये केवळ थर्ड पार्टी किंवा थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान कव्हर केले जाते. किमतीच्या बाबतीत, तो फर्स्ट पार्टी इन्शुरन्सपेक्षा स्वस्त आहे. कायद्यानुसार, सर्व वाहनधारकांकडे थर्ड पार्टी इंश्युरन्स असणं आवश्यक आहे.
कोणता इंश्युरन्सन घेणं फायदेशीर ठरेल
फर्स्ट पार्टी इंश्युरन्स खर्चाच्या दृष्टीने महाग असतो. परंतु चोरी आणि अपघाताच्या वेळी तुमच्या वाहनाला संरक्षण देते. तुम्ही कोणता विमा घेत आहात हे तुमच्या बजेटवर अवलंबून आहे. तर थर्ड पार्टी इंश्योरन्समध्ये थर्ड पार्टी आणि थर्ड पार्टी वाहनाचं नुकसान कव्हर होतं. म्हणून फर्स्ट आणि थर्ड पार्टी यापैकी फर्स्ट पार्टी इंश्युरन्स फायदाचं आहे.