हा Click here प्रकार आहे तरी काय? अनेकांच्या Timeline वर या पोस्टचा पाऊस; BJP, AAP चीही पोस्ट
What is Click here Trend: सोशल मीडियावर खास करुन एक्सवर (आधीचं ट्वीटर) शनिवार रात्रीपासून अनेकांच्या टाइमलाइनवर या Click here पोस्टचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वेगवेगळी अकाऊंट्स असली तरी पोस्ट सारखीच असल्याचं दिसत आहे. हा प्रकार नेमका काय आहे पाहूयात...
What is Click here Trend: शनिवारी सायंकाळपासून एक्सवर (पूर्वीचं ट्वीटर) एक वेगळाच ट्रेण्ड दिसून येत आहे. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवर खालच्या दिशेने डाव्या बाजूला जाणारा बाण असा फोटो आणि त्यावर केवळ 'click here' हे दोन शब्द बोल्ड अक्षरांमध्ये लिहिलेले दिसतात. सोशल मीडियावर अगदी अधिकृत ट्विटर हॅण्डलपासून अनेकांच्या अकाऊंटवर हा असा बाण आणि तेच कॅप्शन पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुमच्या टाइम लाइनवरही तुम्हाला 'click here' लिहिलेल्या अनेक पोस्ट दिसत आहेत का? मग हे 'click here' प्रकरण आहे तरी काय? चला याचबद्दल जाणून घेऊयात...
नेमका हा प्रकार काय?
डाव्या बाजूला खालच्या दिशेने जाणारा हा बाण 'अल्ट टेक्सट' किंवा अल्टरनेटीव्ह टेक्स्ट सेक्शन अधोरेखित करतो. सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना त्याच्यासोबत काही महिती द्यायची असल्याच या फिचरचा फायदा होतो. दृष्टीदोष असलेल्या किंवा दृष्टीसंदर्भातील समस्या असलेल्यांना या माध्यमातून टेक्स टू स्पीच पद्धतीने मजकूर ओळखण्यास मदत होते. तसेच याचा संदर्भ ब्रेल भाषेशीही जोडण्यात आला आहे. फोटो डिस्क्रीप्शनमध्ये अल्ट टेक्स फिचरच्या माध्यमातून 420 कॅरेक्टरचा मजकूर पोस्ट करता येणार आहे. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास त्या बाणाच्या टोकाजवळ असलेल्या ALT या पर्यायावर क्लिक केल्यास इमेजबरोबरचा मेसेज युझर्सला वाचता येतो.
8 वर्षांवपूर्वीचं फिचर
एक्सवर सर्वात आधी 2016 मध्ये हे फिचर लॉन्च करण्यात आलेलं. "आम्ही सर्वांना सशक्त करण्यासाठी आणि ट्विटरवर शेअर केलेला कंटेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून ही सुविधा सुरु करत आहोत," असं कंपनीने 8 वर्षांपूर्वी ही सुविधा लॉन्च करताना म्हटलं होतं.
शिवसेनेच्या माहिला खासदारालाही पडला प्रश्न
अचानक सोशल मीडियावर अनेक अकाऊंट्सवरुन 'click here' च्या पोस्ट दिसू लागल्या आणि टाइमलाइन या पोस्टने भरुन गेल्याने अगदी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपासून सर्व सामान्यांनही गोंधळून गेलेत. हे 'click here' प्रकरण काय आहे असं राजकीय नेत्यांपासून सोशल मीडिया इनफ्युएन्सर विचारताना दिसत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचाही समावेश आहे. त्यांनी शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास, "या 'click here' फोटोमागील गोष्ट काय आहे? माझ्या संपूर्ण टाइमलाइनवर हेच दिसत आहे," असं चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
भाजपाचीही पोस्ट
भाजपाने या ट्रेण्डनुसार 'click here' पोस्ट केली असून त्यांनी या माध्यमातून, 'फिर एक बार मोदी सरकार' असा संदेश दिला आहे.
'आप'नेही केली पोस्ट
आम आदमी पक्षानेही 'click here' पोस्टमधून आज रामलीला मैदानात होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन फॉलोअर्सला केल आहे. अगदी आयपीएलच्या टीमही हे फिचर वापरत आहेत.
अशी पोस्ट करायची तरी कशी?
मोबाईलवरुन फोटो शेअर करताना ALT पर्याय निवडून त्यामध्ये हवा तो मजकूर लिहावा आणि इमेज पोस्ट करावी. फॉलोअर्सला या फोटोसोबत जोडलेली माहिती वाचण्यासाठी फोटोच्या खालील बाजूस ALT असा क्लिकेबल पर्याय दिसतो आणि त्यावर क्लिक केल्यावर फोटोसोबत शेअर केलेला मजकूर वाचता येतो.