How to stop a vehicle if brakes fail: गाडी चालवताना कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे गाडी व्यवस्थितरित्या चालवणं आवश्यक आहे. कारण एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे कार चालवताना गाडीचा कोणता पार्ट कधी खराब होईल सांगता येत नाही. विचार करा गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर काय होईल. अशा स्थितीत कोणीही घाबरेल. पण काही टिप्स तुम्हाला माहिती असतील तर ती स्थिती तुम्ही व्यवस्थितरित्या हाताळू शकता. खूप कमी जणांना अशा ट्रिक माहिती आहेत की ब्रेक फेल झाला तर काय करावं. जर भविष्यात तुम्हीही अशा चक्रव्यूहात अडकला तर पुढे दिलेल्या टिप्स तुमच्या कामी येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी कराल कार कंट्रोल- तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर घाबरू नका. हळूहळू गाडीचे गियर आणि वेग कमी करा. जर तुम्ही गाडी टॉप गियरमध्ये चालवत असाल तर आधी वेग कमी कमी करत गियर खाली करा. पण एका झटक्यात पाचव्या गियरवरून पहिल्या गियरमध्ये आणू नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान वारंवार ब्रेक दाबत राहा. असं केल्यानं ब्रेकला प्रेशर मिळतं आणि काम करू लागतो.


इमर्जन्सी लाइट आणि हॉर्न- तुम्हाला वाटलं की ब्रेक फेल झाला आहे तर हॅजार्ड लाइट्स लावली पाहीजे. यामुळे मागून येणाऱ्या गाडीला सूचना मिळेल. दुसऱ्या वाहनांना हॉर्न, इंडिकेटर आणि हेडलँप्स-डिपरच्या मदतीने इशारा करु शकता. 


रिव्हर्स गियर टाकू नका- अशा स्थितीत कार चुकूनही रिव्हर्स गियरमध्ये टाकू नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक्सलेटरचा वापर करू नका आणि फक्त क्लचचा वापर करा. अशा स्थितीत तुम्ही एसीदेखील ऑन करू शकता. त्यामुळे इंजिनवर दाब वाढेल आणि वेग कमी होईल.


Cheap Tesla Car: भारतासाठी एलोन मस्क यांचा जबरदस्त प्लान! इंडोनेशियात केली मोठी घोषणा


हँडब्रेक वापरा- कारचा वेग नियंत्रणात आल्यानंतर गाडी दुसऱ्या गियरमध्ये आणा. वेग 40 किमी प्रतितास असल्यास हँडब्रेक खेचून गाडी थांबवू शकता. पण अशा स्थितीत मागून कोणतं वाहन येते की नाही ते पाहा. दुसरीकडे गाडीचा वेग जास्त असताना हँडब्रेक खेचला तर गाडी पलटी होऊ शकते.