चाळीशी ओलांडलेल्या महिला Google वर सर्वाधिक काय Search करतात? विषय असे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल
चाळीत येणाऱ्या आणि चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी शोधलेले मुद्दे जवळपास एकसारखेच.
Google Search : 'बाबा गुगल की जय हो...', असं म्हणत मनात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण गुगलचा आधार घेतो. घर स्वच्छ करण्याच्या स्मार्ट पद्धतींपासून ते अगदी तब्येत बिघडली तरीही आपण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी या गुगलशी (Google) गट्टी करतो. आता ते कितपत योग्य हे तुम्हालाच ठरवायचं आहे. पण, थोडक्यात लक्ष देण्याजोगा मुद्दा म्हणगे गुगलनं आसा प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत शंकानिरसन करण्याचा विडा उचलला आहे.
कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असो, त्याच्यासाठी Google कडे काही ना काही आहेच. काही दिवसांपूर्वीच AARP कडून एक अशी यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये वयवर्षे 40 पूर्ण झालेल्या अर्थात चाळीशी ओलांडलेल्या महिला काय सर्च करतात यावरून पडदा उचलण्यात आला होता.
अधिक वाचा : Whatsapp, Instaram आणि Facebook यूजर्ससाठी मोठी बातमी
चाळीत येणाऱ्या आणि चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी शोधलेले मुद्दे जवळपास एकसारखेच. पाहा त्यांना नेमके कोणते प्रश्न पडतात....
- माझी मासिक पाळी (Periods) नियमित का येत नाही?
- (Bone density) हाडांची झीज होत असल्याची प्राथमिक लक्षणं काय?
- बोटॉक्सनं (Botox) इजा होते का?
- महिलांच्या केसगळतीची (hairfall) कारणं काय?
- सर्वोत्तम CBD Oil कोणतं?
- मला गुडघेदुखी होऊ शकते का?
- Viagra
- (Secual Attraction) शारीरिक आकर्षण/ संबंधांचं प्रमाण का कमी होतं?
महिलांनी सर्च केलेल्या या गोष्टींमध्ये बहुतांश मुद्दे त्यांच्या आरोग्याशी संबंधित आहेत. तिथपासून आहाराच्या सवयी, सुंदर दिसण्यासाठीचे उपाय इथपर्यंत हे प्रश्न पोहोचले आहेत. नातेसंबंधांविषयीसुद्धा या महिलांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित होतात.
(Women in 40s) चाळीशीनंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. महिलांच्या आयुष्यात हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळं प्रत्येक महिलेच्या स्वभाव आणि राहणीमानानुसार Google Search बदलतं.