मुंबई : नववर्ष २०२० पासून काही मोबाईल मॉडेल्समध्ये व्हॉट्सऍप (Whatsapp) बंद होणार आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टम काही मोबाईल फोनमध्ये सपोर्ट करणार नसल्याने सोशल मेसेजिंग ऍप Whatsapp अशा फोनमध्ये बंद होणार आहे. 


विंडोज् Windows फोन -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ डिसेंबर २०१९नंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोनमधील Whatsapp काम करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. Windows Mobile software आता जुने झाले आहेत. आणि हे फोन व्हॉट्सऍपच्या नव्या अपडेटला सपोर्ट करत नाही. Windows Mobile वर Whatsapp बंद करण्याची घोषणा कंपनीकडून काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती.


Android versions 2.3.7 स्मार्टफोन -


व्हॉट्सऍप बंद होणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये Android versions 2.3.7 (Gingerbread)देखील सामिल आहे. जर तुमचा ऍन्ड्रॉइड फोन Android versions 2.3.7 आहे आणि त्या फोनमध्ये नवीन अपडेट होत नसेल तर त्या फोनमध्ये  Whatsapp सुरु होणार नाही. 


iPhone चा iOS 8 -


ऍपलच्या ज्या फोनमध्ये iOS 8 आहे, त्या फोनमध्ये व्हॉट्सऍप बंद होणार आहे. दरम्यान, ऍपलच्या सर्व स्मार्टफोनमध्ये iOS12 असल्याचं ऍपलकडून सांगण्यात आलं आहे. संपूर्ण जगात केवळ ७ टक्के यूजर्सकडे जुनं व्हर्जन असल्याची माहिती आहे.