नवी दिल्ली : व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चॅटवर अनेकदा चुकून मेसेज पाठवला जातो आणि मग आपण डोक्याला हात मारतो. परंतु, यापुढे ही तुमची ही चिंता मिटणार आहे. कारण आपल्या अँड्रॉइड आणि IOS युजर्ससाठी लवकरच व्हॉट्स अॅपवर रिकॉल बटणाची सुविधा सुरू होणार आहे. 'डिलीट फॉर एव्हरीवन' असे या फिचरचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्स अॅप सध्या डिलीट फॉर एव्हरीवन फीचरची चाचणी करत असल्याची माहिती व्हॉट्स अॅप बीटा इन्फो नावाच्या वेबसाइटने ट्विट करून दिली आहे. त्याचबरोबर त्यात असं देखील म्हटलं आहे की, 'सर्व्हर काम करत आहे आणि पाठवलेले मेसेजही यशस्वीपणे रिकॉल होत आहेत. लवकरच हे फिचर वापरण्यास उपलब्ध होऊ शकतं.'


या फीचरमुळे आपण मेसेज, फोटो, व्हिडिओ, ऑडियो, GIF फाईल्स रिसिव्हरपर्यंत पोहोचण्याआधीच डिलीट करू शकतो. पण त्यासाठी मेसेज पाठवल्यानंतर ५ मिनिटांच्या आत तो डिलीट करणे आवश्यक आहे.