सेंट फ्रांसिस्को : व्हाट्स अॅप लवकरच एक नवीन अॅप लॉन्च करणार आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार, कंपनी स्टैंडअलोन अॅपवर काम करत आहे. हे अॅप आशिया खंडासाठी असेल.


नवीन अॅप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर व्यापारी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हाट्स अॅपचा वापर करतात. म्हणून खास करून आशिया खंडासाठी व्हाट्स अॅपने व्यापाऱ्यांसाठी वेगळे अॅप लॉन्च करण्याची तयारी केली आहे. 
व्हाट्स अॅपच्या वेबसाईटवर प्रकाशित वृत्तानुसार, रियल आणि फेक अकाऊंट ओळखण्यासाठी विशेष माहिती दिली आहे.


व्हाट्स अॅपच्या एफएक्यू यांनी सांगितले की, व्यावसायिकांशी बातचित करताना तुम्ही रियल प्रोफाईल तपासून पाहू शकता. रियल अकाऊंटसमोर हिरव्या रंगाचे चेकमार्क बॅच असतील. 


मीडिया रिपोर्टनुसार, स्टैंडअलोन अॅपची अजून टेस्टिंग चालू आहे. लवकरच हे अॅप व्हाट्स अॅप बिजनेस नावाने लॉन्च करण्याची आशा आहे. यात काही खाल फीचर्स असतील. ऑटो रेसपांसेस, बिजनेस प्रोफाईल बनवण्याची सुविधा, चॅट माइग्रेशन आणि अॅनालिटीक या सुविधा असतील. यापुर्वी कंपनीने एक बिजनेस टूल लॉन्च केले. 


कसे असेल हे अॅप ?


व्हाट्स अॅप बिजनेस अॅप सध्याच्या अॅपपेक्षा वेगळे असेल. यूजर इंटरफेस साधारण व्हाट्स अॅपसारखेच असेल. यात युजर्ससाठी खास फिचर्स देण्यात आले आहेत.
काही दिवसांपुर्वी व्हाट्स अॅपने युजर्सने डिलीट फॉर एवरीवन हे फीचर लॉन्च केले. यात तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करू शकता. मात्र यासाठी तो पाठवल्यानंतर ७ मिनीटात डिली़ट करणे आवश्यक आहे.