मुंबई: मित्रांपासून ते कामापर्यंत सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे whatsapp. संवादाचं उत्तम सहज आणि सोपं माध्यम आहे. एकाच वेळी अगदी गप्पा मारण्यापासून ते कामाचे डॉक्युमेंट पाठवण्यापर्यंत अनेक गोष्टी या Whatsapp वर सर्वजण करत असतो. आता याच whatsapp युझर्सना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लवकरच एक फीचर बंद होणार असल्याची चर्चा आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Whatsapp व्हिडीओ कंट्रोल iOS बीटावर उपलब्ध आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल आता whatsapp वर व्हिडीओ पाठवताना दिसणार आहे. 6 सेकेंदाचा व्हिडीओ जर तुम्ही पाठवत असाल तर त्याला GIFमध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय देखील येतो. 6 सेकंदापेक्षा जास्त असेल तर थेट सेंड असा पर्याय येतो. आता यामध्ये काही अजून फिचर अॅड करण्यात आले आहेत. 


iOS बीटा अॅपमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट आणण्यात आले आहे, जे व्हिडिओवर अधिक नियंत्रण ठेवतं. नवीन यूजर इंटरफेसमध्ये GIF टॉगल बटणाच्या अपोझिट बाजूला बटण देण्यात आलं आहे. जे व्हिडिओ पाठवताना व्हिडीओ म्यूट करण्यासाठी असेल. 


व्हिडीओ म्यूट बटणाच्या पुढे व्हिडीओ किती मोठा आणि किती मिनिटांचा आहे याची माहिती देण्यात आली. WABetaInfo च्या मते, प्रत्येक वेळी जेव्हा व्हिडीओ पाठवाल तेव्हा तिथे लगेच त्या व्हिडीओची माहिती ऑटो अपडेट होणार आहे. 


दुसरे वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल शॉर्टकट आहे. जे व्हॉट्सअॅपच्या एण्ड्रॉइड बीटावर उपलब्ध आहे. मेसेजिंग अॅपने त्याच्या ग्रुप कार्ड सेक्शनमध्ये ग्रुप व्हॉईस कॉल आणि ग्रुप व्हिडीओ आयकॉनसोबत दिलं आहे. 


विशेष म्हणजे हे शॉर्टकट वैयक्तिक गप्पांसाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं. नव्या अपडेटनुसार जर तुम्ही whatsapp ओपन केलं तर ग्रूपच्या डीपीवर टॅब करा. तिथे तुम्हाला कॉलिंग आयकॉन अगदी खाली दिसेल. यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये जाण्याची गरज नाही. 


WhatsApp कडून काढून टाकण्याचे कारण काय?
WABetaInfo च्या मते, कंपनी या फीचरच्या मदतीने यूजर्सवर लक्ष ठेवत होती आणि आकडेवारीनुसार, हे फीचर यूजर्स करुन वापरले जात नव्हते, ज्यामुळे याला काढण्याचा निर्णय कंपनीने घेतला असावा. बातमीनुसार, हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप बीटा iOS 2.21.190.11 आणि व्हॉट्सअ‍ॅप बीटा अँड्रॉइड 2.21.19.15 या दोन्ही बीटा व्हर्जनवर बंद करण्यात आला आहे. या चॅट मेनूमधून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेंजर रूम शॉर्टकट काढून टाकल्यानंतर, यूजर्स आता डॉक्यूमेंट्स, कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ आणि कॉन्टॅक्टचे शॉर्टकट पाहू शकतील.