मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. पण फ्रांसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅपने माहिती त्यांची पेरेन्ट कंपनी फेस्बुकसोबत शेअर करू नये अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच चेअर ऑफ नॅशनल डाटा प्रोटेक्शन कमिशनने फेसबुकला देण्यात आलेल्या माहितीचा सॅम्पल  अहवाल मागितला आहे.  


व्हॉट्सअ‍ॅपसोबत फेसबुक 


२०१४ साली फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतले. त्यानंतर २०१६ पासून टार्गेटेड अ‍ॅडव्हटायझिंग, सिक्युरिटी अ‍ॅन्ड इव्हॅल्युएशन आणि इम्प्रुव्हमेंट ऑफ सर्व्हिस अशा तीन कारणास्तव व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकसोबत माहिती शेअर करते.  


फ्रान्सकडून मात्र ही माहिती शेअर करणं  कायदेशीर नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 


इतर देशांकडूनही मागणी 


फ्रान्सप्रमाणेच काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने फेस्बुकसोबत माहिती शेअर करण्यावरून वाद निर्माण झाला होता. जर्मनीने माहिती शेअर न करण्याची मागणी केली होती.