Whatsapp Bug: `या` मेसेजमुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो क्रॅश
व्हॉट्सअॅपशिवाय जगणं आजकाल अनेकांसाठी अगदी अशक्य झाले आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅपशिवाय जगणं आजकाल अनेकांसाठी अगदी अशक्य झाले आहे. सोशल मीडियामध्ये अफवादेखील झपाट्याने पसरतात. अशातच आता एका मेसेजमुळे व्हॉटसअॅप क्रॅश होऊ शकतं अशा आशयाचे काही मेसेज फिरत आहेत. व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार, अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही फोनना त्याचा धोका आहे.
काय आहे हा मेसेज?
अॅन्ड्रॉईड आणि आयओएसच्या युजर्सना काही मेसेज येत आहेत. यामुळे काही स्पेशल कॅरेक्टर्स छुप्या स्वरूपात आहेत. यामुळे टेक्स्टची प्रक्रिया बदलते. या अदृश्य स्वरूपातील सिम्बॉलमुळे व्हॉट्सअॅप फ्रीज होत आहे.
व्हॉट्सअॅपवर एक असाही मेसेज व्हायरल होत आहे ज्यामुळे काही सेकंदासाठी व्हॉट्सअॅप हॅंग होत आहे. त्यामध्ये असं लिहण्यात आले आहे की जर ब्लॅक पॉईंटवर क्लिक केले तर तुमचे व्हॉट्सअॅप हॅंग होईल. त्या ब्लॅक आयकॉनवर क्लिक केल्यानंतर अॅप फ्रीज होते.
काय आहे कारण ?
काही रिपोर्ट्सनुसार, मेसेज थ्रेड अॅपच्या टेक्स्ट आणि ब्लॅक डोटमधील अंतरामुळे क्रॅश होत आहे.या मेसेजला HTML मध्ये कन्वर्ट केल्यानंतर टेक्स्टमध्ये राईट टू लेफ्ट मार्क असल्याचे समजून येत आहे. हे फॉर्मेटिंग अदृश्य स्वरूपातील आहे. यामध्ये लेफ्ट टू राईट आणि राईट तू लेफ्टमधील अंतर समजते. चुकीच्या फॉर्मेटिंग कॅरेक्टरचा वापर केल्याने अॅप क्रॅश होऊ शकते.
व्हायरस नाही
व्हॉट्सअॅप क्रॅश होण्यामध्ये कोणताही व्हायरस नाही. मात्र तुम्हांला संबंधित कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नका. अनोळखी क्रमांकावरून कोणताही मेसेज आला तर तो उघडू नका. व्हॉट्सअॅपप्रमाणेच इतर मॅसेजिंग अॅपही अशाप्रकारच्या बगमुळे धोक्यात आली होती.