मुंबई : जवळपास 2 तासांच्या खोळंब्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) पूर्ववत झालंय. व्हॉट्सअ‍ॅप गंडल्याने नेटकऱ्यांनी आपला मोर्चा ट्विटरवर (Twitter) वळवला होता. ट्विट करत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याने नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली. जगातील बहुतांश लोकं व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्याने यूझर्सना चांगलाच संताप सहन करावा लागलाय. मात्र तुम्हाला परत असा संताप सहन करावा लागू नये, यासाठी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपला तोडीसतोड असलेले 5 चॅटिंग प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहोत. (whatsapp down use signal app telegram jio chat sharechat and facebook messenger 5 alternative apps for whatsapp know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिग्नल (Signal App)अ‍ॅंड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येऊ शकते. हे व्हॉट्सअ‍ॅपसारखे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देखील देतं. तसेच हे अ‍ॅप फुकट आहे.



व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा स्पर्धक असलेला टेलिग्राम (Telegram) , iOS आणि Android या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवरही काम करतो. हे 500 दशलक्षाहून अधिक लोक वापरतात आणि व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व फीचर्स आणि इतर अनेक फीचर्सही यामध्ये देण्यात येत आहेत. 



जिओ चॅट (Jio Chat) हे भारतीय चॅटिंग अ‍ॅप देखील खूप उपयुक्त आहे. पण केवळ Jio यूझर्सच हे अ‍ॅप वापरु शकतात.  या अ‍ॅपद्वारे आपल्या जिओ कॉन्टक्ट्सच्याच्या संपर्कात राहू शकता.



शेअरचॅट (Sharechat) 400 दशलक्ष सक्रिय यूझर्स आहेत.  या अ‍ॅपमध्ये खाजगी संदेशवहन सारखी अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत ज्याचा वापर सहजपणे  करता येतो. 




मेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचं मेसेजिंग (Facebook Messenger) अ‍ॅप, फेसबुक मेसेंजर चॅटिंग, व्हीडिओ कॉलिंग आणि व्हॉईस कॉलिंगसाठी  वापरता येईल.  हे देखील एक फ्री अ‍ॅप आहे.