मुंबई : भारत आणि अमेरिकासह सात देशांत व्हॉट्सअॅप बंद झाल्याने याचा त्रास मोठ्याप्रमाणात व्हॉट्सअॅप यूजर्सना सहन करावा लागला. हे व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅप  बंद पडल्याने भारतासह जगभरातील व्हॉट्सअॅप यूजर्सना त्रास सहन करावा लागला. मेसेज  पाठविले जात नसल्याने काय झालेय तेच कळत नव्हते. दरम्यान, एकमेकांना फोन करुन यूजर्सने विचारल्यानंतर व्हाट्सअॅप बंद असल्याचे कळले. मात्र, व्हॉट्सअॅप बंद होण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. 


याआधी  शुक्रवारी सकाळी अमेरिका, यूके, इटली आणि सौदी अरेबियासह सात देशांमध्ये व्हॉट्सअॅप काम करत नसल्याचे वृत्त होते. व्हॉट्सअॅप बंदची बातमी सगळ्यात आधी ब्रिटनमधून आली.


तासाभरापासून व्हॉट्सअॅप बंद असल्याने अनेक यूजर्सनी ट्विटरवर तक्रारी पोस्ट केल्यात त्यानंतर व्हॉट्सअॅप  बंद असल्याचे समजले. व्हॉट्सअॅपवरून पाठवलेले मेसेज इतरांना मिळत नव्हते. ट्विटर सुरू केल्यानंतर त्यावर #whatsappdown असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. ६० टक्के लोकांना व्हॉट्सअॅप  बंद असल्याचा फटका बसला.


दरम्यान, बंद पडलेले व्हॉट्सअॅप सुरु झालेय. आता मेसेजही सेंड आणि रिसिव्ह होत आहेत. याआधी व्हॉट्सअॅप सप्टेंबरमध्येही बंद झाले होते.