Whatsapp free calling to be chargeable soon: तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही झटपट झालं आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून संपूर्ण जग एकमेकांच्या जवळ आलं आहे. एका क्लिकवर कामं होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अ‍ॅपच्या माध्यमातून मोफत कॉल करण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र आता यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. लवकरच ट्राय हा प्रस्ताव सरकारला देणार आहे. यापूर्वी ट्रायने  हा प्रस्ताव 2008 मध्ये परत पाठवला होता. कारण तेव्हा भारतात मोबाईल इंटरनेट सेवा सुरुवातीच्या टप्प्यात होती. दूरसंचार विभागाने आता या प्रस्तावाला प्रतिसाद दिला असून TRAI ला सर्वसमावेशक संदर्भ घेऊन येण्यास सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन तंत्रज्ञानाच्या उदयासह तांत्रिक वातावरणात बदल झाल्यामुळे असं पाऊल उचललं जात आहे. द इकॉनॉमिक टाईम्समधील एका अहवालानुसार, दूरसंचार विभागाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला इंटरनेट-आधारित कॉल्सचे नियमन करण्याच्याप्रस्तावावर आपले मत व्यक्त करण्यास सांगितले आहे. संपूर्ण उद्योगासाठी "Same Service, Same Rules" या तत्त्वाचा विचार करण्यासाठी दूरसंचार ऑपरेटर आणि सेवा पुरवठादारांकडून दबाव आणला जात आहे.


नवीन नियम इंटरनेट टेलिफोन ऑपरेटर्स आणि अगदी ओटीटी प्लेयर्सना लक्षात घेऊन बनवण्यास सांगितले आहेत. दूरसंचार विभाग आता या प्रस्तावावर विचार करत आहे. हा कायदा मंजूर झाल्यास, Google Duo, WhatsApp, Instagram, Facebook Messenger, Signal, Telegram आणि तत्सम सर्व सेवांच्या मोफत टेक्स्टिंग आणि कॉलिंगवर पैसे द्यावे लागतील.  या सेवांवर दर आणि शुल्क कसे लागू केले जातील? याकडे लक्ष लागून आहे.