Online न दिसता WhatsApp वर मेसेज करायचाय? जाणून घ्या ही सोपी पद्धत
आता तुम्ही ऑनलाइन स्टेटस लपवू शकता आणि इतरांच्या मेसेजला रिप्लायही देऊ शकता.
WhatsApp Updates : गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी मोबाईल फोनच्या मेसेजमधून एकमेकांना मेसेज पाठवले जायचे. मात्र WhatsApp आपलं आणि लोकांचं आयुष्य बदललं. चॅटिंग अॅप्सबद्दल बोलायचे झालं तर जगभरात WhatsApp ने युजर्सची मने जिंकली आहेत. WhatsApp हा सर्वसामान्य लोकांनाही वापरण्यास सोप असल्याने WhatsApp चा चाहत्या वर्ग मोठा आहे. आज तुम्हाला एकही व्यक्ती सापडणार नाही जो WhatsApp वापरत नाही असा सापडणार नाही. WhatsApp चा चाहत्या वर्ग पाहता WhatsApp आपल्या यूजर्ससाठी वेळोवेळी नवीन फिचर आणत असतो.
WhatsApp वर एखाद्याला रिप्लाय करताना इतरांना तुम्ही Online आहात हे दिसतं. आपण Online असूनही अनेकांना हे ऑनलाइन स्टेटस लपवायचं असतं. आता तुम्ही ऑनलाइन स्टेटस लपवू शकता आणि इतरांच्या मेसेजला रिप्लायही देऊ शकता. WhatsAppकडून या संदर्भात अधिकृत्य माहिती आली नाही. मात्र या फीचरची माहिती WABetaInfo कडून आली आहे. या फिचरचे वैशिष्ट्य काय आहे आणि ते कसे कार्य करते ते आम्हाला सविस्तर माहिती द्या.
गुपचूप करा मेसेज आणि कोणाला कळणार पण नाही!
या फीचरच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन न दिसता हवे तेव्हा कोणालाही मेसेज करू शकता आणि तुम्ही तुमचे चॅट उघडल्यावर समोरच्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे कळणार नाही. तुम्ही WhatsAppवर प्रोफाईल फोटो, स्टेटस आणि व्हॉट्सअॅपवर शेवटचे स्टेटस हे लपवण्याचा पर्याय होता. पण WhatsApp वर ऑनलाइन स्टेटस लपवता येत नव्हतं. आता तुम्हाला असं करता येणार आहे.
हे फीचर 2.22.16.12 रोजी व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनवर दिसले आहे. यासंदर्भातील WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये त्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
कसा करायचा वापर
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल, मग त्याच्या सेटिंग्जमध्ये जा. त्यानंतर 'खाते' वर क्लिक करा. त्यानंतर 'प्रायव्हसी'मध्ये तुम्हाला 'लास्ट सीन आणि 'ऑनलाइन'चा पर्याय दिसेल. ते निवडून, तुमची ऑनलाइन स्थिती कोण पाहू शकते हे तुम्ही लपवू शकता.
मात्र हे फीचर WhatsApp यूजर्स कधीपासून वापरू शकले त्यासंदर्भात कोणत्याही तारखेची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच हे फीचर WhatsAppवर वापरता येईल.