इतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!
Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.
Whatsapp हे असे अॅप आहे जे जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्ते वापरतात. चॅटिंगपासून ते अधिकृत कामापर्यंत त्याचा वापर होतो. कारण त्याचा खूप वापर केला जातो. परिणामी गुंड, इतर लोक आणि सायबर गुन्हेगारांनीही याला टार्गेट करायला सुरुवात करतात. असे बरेचदा घडते की कोणीतरी आमचे व्हॉट्सअॅप चॅट वाचत आहे. परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की इतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे...
व्हॉट्सअॅप वेब वापरण्यासाठी व्हॉट्सअॅपने अॅपमध्ये लिंक डिव्हाइस नावाचे फीचर दिले आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही फोन सोडून इतर डिव्हाईसमध्ये WhatsApp वापरू शकता. या प्रकारचे लॉगिन त्या उपकरणावरील QR कोड स्कॅन करून केले जाते. या दरम्यान, तुम्हाला एकदा तुमचा पिन कोड देखील टाकावा लागेल. याद्वारे तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटमध्ये कोणीतरी वापरत असतात. खरं तर, अनेकदा असं होतं की गरज पडेल तेव्हा आपण वेगवेगळ्या उपकरणांवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन करतो, पण लॉगआउट करायला विसरतो.
वाचा : WhatsApp वर चुकूनही 'हे' मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत!
जाणून घ्या, असे व्हॉट्सअॅप कुठे चालते
आता तुमचे अकाऊंट कुठेही चालत नाही ना हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. तर त्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करा. यानंतर वरच्या उजव्या बाजूला बनवलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. आता तुम्हाला Linked Device चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. येथे काळजीपूर्वक पहा. इथे तुमचे व्हॉट्सअॅप इतर कोणत्याही डिव्हाईसवर चालू असेल तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. जर तुम्हाला एखादे उपकरण दिसले जेथे तुम्हाला लॉग इन करण्याची आवश्यकता नाही, तर लगेच त्यावर क्लिक करा आणि लॉगआउटचा पर्याय निवडा. एकदा तुम्ही लॉग आउट केल्यानंतर, तुमच्या संमतीशिवाय तुम्ही त्या डिव्हाइसवर पुन्हा लॉग इन करू शकत नाही.