मुंबई : हॅकर्सनी आता App किंवा जाहिरातीच्या माध्यमातून फोनमध्ये व्हायरस सोडून हॅक करण्याचा फंडा बाजूला ठेवला आहे. आता त्यांना Whatsapp ला टार्गेट केलं आहे.  +92 हा कोड वापरून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कॉल केले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर अशा नंबरवरून फोन आला किंवा मेसेज आला तर आताच सावध व्हा. नाहीतर तुमच्या फोनमधील सगळा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या फोनमधील सगळी खासगी माहिती हॅकर्सच्या हाती लागू शकते. एवढंच नाही तर ते तुमचं खातंही रिकामं करू शकतात. 


 +92 हा पाकिस्तानचा कंट्री कोड आहे. तर भारताचा +91 आहे. त्यामुळे हे फोन पाकिस्तानमधून किंवा त्यांचा कोड वापरून केले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. तर कधीकधी व्हर्चुअली याचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. 


तुम्हाला जर या कोडचा वापर करून कॉल किंवा मेसेज येत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. याशिवाय हे फोन रिपोर्ट करा. त्याला रिप्लाय देणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. कधीकधी स्कॅमर्स चांगला डिपी लावून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष करा. 


तुम्ही अनोळखी नंबर ब्लॉक करू शकता किंवा रिपोर्ट करू शकता. तुमची एक चूक तुमचं मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे तुम्ही याची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कोणालाही तुमची माहिती, OTP देऊ नका. तुमची माहिती अनोळखी लोकांना देणं धोक्याचं ठरू शकतं.