मुंबई : आपण सर्वात जास्त वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Whatsapp बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे Whatsapp वर ग्रुपव बनवणाऱ्या अ‍ॅडमिनला मोठा दिलासा मिळला आहे. खरेतर Whatsapp हे जगभरातील सर्वात लोकप्रिय ऍप आहे. ज्याच्या माध्यमातून आपण आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जोडले जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Whatsapp वर आपण आपल्या मित्रांना फोटो, व्हिडीओ आणि माहिती शेअर करतो. येथे आपले ठराविक ग्रुप देखील असतात. ज्यावर आपण त्या त्या संदर्भाबाबत माहिती शेअर करत असतो. परंतु मधल्या काळात असे काही नियम समोर आलं आहे. ज्यामध्ये असे बोलले जात होते की, जर एखाद्या ग्रुपमधील सदस्याने कोणतीही चुकीची माहिती किंवा व्हिडीओ शेअर केला तर त्याची शिक्षा ऍडमिनला होणार.


परंतु यासंदर्भात आता केरळ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने या निर्णयात म्हटले आहे की, कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजसाठी ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाऊ शकत नाही.


खरेतर मार्च 2020 मध्ये 'फ्रेंड्स' नावाच्या एका WhatsApp ग्रुपमध्ये एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये लैंगिक कृत्यामध्ये सहभागी लहान मुलं होती, ज्यामुळे या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


परंतु या केसचा निर्णय देत कोर्टाने आपण यासाठी अ‍ॅडमिनला गुन्हेगार ठरवू शकत नाही, असा निर्णय दिला आहे. WhatsApp अ‍ॅडमिन आयटी कायद्यांतर्गत मध्यस्थ होऊ शकत नाही असं ही कोर्टाने म्हटलं आहे.