WhatsApp च्या नव्या फीचरमुळे चॅटिंगची मजा होईल दुप्पट, जाणून घ्या नेमकं कसं?
Whatsapp Update : व्हॉट्सअॅपने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक जबरदस्त फीचर्स लाँच करत आहे. व्हॉट्सअॅपने एकापेक्षा अधिक फोनवर किंवा एकच खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता व्हॉट्सअॅपच्या आणखी एका फिचरमुळे चॅटिंगची मजा दुप्पट होणार आहे...कसं ते जाणून घ्या...
WhatsApp Feature Update: Whatsapp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्याही जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप स्मार्टफोनचा आत्माचा आहे असं म्हणावं लागेल. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन कंपनी नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच मेसेजिंगला अधिक मजेशीर आणि उत्पादन बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही नवीन फीचर्स सादर केली आहेत. ज्यामध्ये पोल्सचा आणि कॅप्शनसह मीडिया आणि दस्तऐवज फॉरवर्ड करण्याची परवानगू देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सचा वापर कसा करायचा याबद्दल जाणून घ्या...
व्हॉट्सअॅपने (WhatsApp Feature Update) दोन नवीन फीचर्स अपडेटेड करण्यात आले असून याचा तुम्हाला चॅटिंगसाठी सार्वधिक फायदा मिळू शकतो. दोन्ही वेगवेगळ्या फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पोल अपडेट्स आणि यूजर कॅप्शनसह मीडिया फॉरवर्ड करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपने सिंगल ऑप्शन पोल (Single option polls) जारी करण्यात आला असला तरी याचा वापर करून युजर्स एकदाच पोल देऊ शकणार आहेत. Meta च्या मते, अपडेट्स वापरण्यासाठी वापरकर्ते 'Allo Multiple Answers' पर्याय बंद करू शकतात. हे फीचर iOS WhatsApp वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे.
वाचा : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी, गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
यामध्ये पोल अपडेट्स अंतर्गत पोल निर्मात्यांना आता त्यांना पोल उत्तरे मिळाल्यावर त्यांना सूचना मिळू शकतील..तसेच यामध्ये किती लोक मतदान केले हे ही पाहू शकतात? याव्यतिरिक्त, वापरकर्ते पोलमधील संदेश फिल्टर करू शकतात.
यात केवळ मजकूर संदेशच नाही तर फोटो, व्हिडिओ आणि लिंक्सचाही समावेश असेल. चॅटवर जाऊन सर्चरवर क्लिक केल्यानंतर यूजर्स 'पोल्स' वर क्लिक करून सर्च करू शकतील. तसेच मेटा ने घोषणा केली आहे की, जेव्हा वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर कोणताही मीडिया फॉरवर्ड करतात तेव्हा त्यांच्याकडे कॅप्शन काढून टाकण्याचा आणि पुन्हा लिहिण्याचा पर्याय असेल, जे चॅटिंग दरम्यान फोटो शेअर करताना अतिरिक्त माहिती देईल. वापरकर्त्यांना फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करताना कॅप्शन जोडण्याचा पर्याय देखील मिळतो.
उदाहरणार्थ, जर एखाद्या मित्राची किंवा कुटुंबाची भेट घेण्याची योजना असेल, तर निर्माता आपला प्रश्न लिहू शकतो आणि 2 किंवा अधिक समानार्थी शब्द लिहून अंदाज बांधू शकतो, तर गटातील प्रत्येकजण त्याचे उत्तर देऊ शकतो. यानंतर, निर्माता अंतिम निकाल देखील तपासू शकतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा जाणून घेऊ शकतो. त्यामुळे मोठ्या गटांचे व्यवस्थापन करणे सोपे झाले असते.