whatsapp new features : व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे मेसेजिंग अॅप (Messaging App) आता आपल्या जीवनाचा अभिवाज्य भाग बनला आहे. इन्स्टंट मेसेजिंग (Instant Messaging), व्हॉईस-व्हिडीओ कॉल (Voice-Video Call) आणि पेमेंट (Payment) यासाठी व्हॉट्सअॅप अगदी सर्रास वापरले जाते. व्हॉट्सअॅपमध्ये काम, व्यवसाय संबंधित महत्त्वपूर्ण माहिती असल्याने त्याचा बॅकअॅप (backup) ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यातच whatsapp वर जुने मेसेज शोधण्याचा प्रयत्न केल्यावर खूप वेळ जातो किंवा अनेक वेळा मेसेज मिळत नाही. मात्र, अशी समस्या उद्भवू नये हे लक्षात घेऊन कंपनीने एक नवीन फीचर आणले आहे जे जुने मेसेज शोधण्यासाठी मदत करेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅप आपल्याला Google ड्राइव्ह आणि iCloud दोन्हीवर क्लाउड बॅकअप तयार करण्याची परवानगी देतं. प्रत्येक वेळी जेव्हा आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा आपण बऱ्याचदा आपले सर्व जुने व्हॉट्सअॅप संदेश, प्रतिमा, मीडिया फाइल्स, कागदपत्रे आणि व्हिडिओ गमावतो आणि ते नंतर त्रासदायक ठरु शकतं. 


व्हॉट्सअॅप एक धमाकेदार फीचर आणत आहे


WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी एका नवीन फिचरवर काम करत आहे.  ज्यामध्ये वापरकर्त्यांना तारखेनुसार जुने मेसेज शोधण्यासाठी परवानगी मिळेल. हे फीचर युजर्ससाठी किती काळ उपलब्ध असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र येत्या महिनाभरात सर्व युजर्स या दमदार फीचरचा लाभ घेऊ शकतील असे सांगितले जात आहे.  


Wabetainfo च्या आलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे, त्यानुसार कंपनी 'Search message by date ' नावाचे फीचर आणत आहे. ज्यामुळे यूजरचा बराच वेळ वाचेल आणि त्यांना जुने मेसेज शोधण्यात मदत होईल. मात्र या फीचरवर अद्याप काम सुरू आहे. त्यामुळे हे फिचर किती दिवसात मिळेल याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.