मुंबई: कोणत्याही अनोळखी ठिकाणी किंवा आपल्याला पत्ता माहिती नसेल तर आपण सहज Google Mapचा वापर करतो. पण जर आपण एखाद्या ओळखीच्या, मित्राकडे जात असू तर त्याच्यासोबत आपलं Whatsapp लोकेशन शेअर करून योग्य पत्ता मिळवू शकतो. किंवा रस्ता चुकला तर त्याला आपण कुठे आहोत हे कळू शकतं. अगदी सोपं आणि फायदेशीर असं या फीचरचं वैशिष्ट्यं आहे. कोरोनाच्या काळात त्याची उपयुक्तता आणखीनच फायदा देणारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकेशन पाठवताना ते नुसतं लोकेशन पाठवायचं की लाईव्ह लोकेशन पाठवायचं हे आधी तुम्ही निश्चित करायला हवं. लाईव्ह लोकेशन पाठवलं तर त्याचा कालावधी तुम्हाला निश्चित करावा लागणार आहे. 15 मिनिटं की 1 तास की त्यापेक्षा जास्त वेळेसाठी हे लोकेशन वापरायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्यानुसार तुम्ही लोकेशन पाठवू शकता. 


तुम्हाला जर लाईव्ह लोकेशन बंद करायचं असेल किंवा त्याची गरज वाटत नसेल तर स्टॉप लाईव्ह लोकेशन असा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर फक्त क्लिक करून तुम्हाला लाईव्ह लोकेशन बंद करायचं आहे. लाईव्ह लोकेशनला तुम्ही त्यावर क्लिक केलं तर एक फोटो क्लिक होईल त्यानंतर मागच्या 10 ते 15 मिनिटांपूर्वी अपडेट झालेलं नवीन लोकेशन तुम्हाला मिळू शकणार आहे.


लाईव्ह लोकेशनच्या कालावधीवर ते किती मिनिटात अपडेट होईल हे अवलंबून असतं.  मात्र त्यामुळे  रस्ते शोधणं किंवा आपल्याला हवं ते दुकानं शोधणं अधिक सोपं आणि सोयीचं झालं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्याला लोकेशन शेअर केलं आहे त्याव्यतिरिक्त दुसरा कोणीही हे लोकेशन पाहू शकणार नाही. म्हणजे दोनच व्यक्ती युझर आणि सेंडर हे लोकेशन पाहू शकणार आहेत.