मुंबई: आपल्या कामापासून ते मित्र मैत्रिणींपर्यंत सगळ्या गोष्टी whatsapp वर आपण बोलत असतो. यापूर्वी अनेकदा Whatsappच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तुमच्या चॅटवर हॅकर्सन नजर ठेवू शकतात ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे आता Whatsapp तुम्ही जर चॅट करत असाल तर जरा जपूनंच करा. कारण तुमच्या चॅटवर हॅकर्सची नजर असण्याचा धोका आहे. त्यामुळे Whatsapp वापरणाऱ्या सर्व युझर्सना अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


Whatsappच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्हं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांनी Whatsappच्या चॅट बॅकअपवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. चॅट बॅकअप करताना एन्ड टू एन्ट सबस्क्रिप्शन क्लाउडसोबत संग्रहित होतं. मात्र एका वृत्तपत्राला तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे चॅट हॅक करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी तुमचं गुगल अकाऊंट हॅक करू शकतात. त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. कारण आपल्या एका गुगल अकाऊंटवर अनेक गोष्टी आपण बॅकअप करतो. या सगळ्या गोष्टी हॅकर्सला अगदी सहज मिळू शकतात. 


क्लाऊड बॅकअप सुरक्षेवर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. तुम्ही गायब होणाऱ्या मसेजचा ऑप्शन निवडून आपलं चॅट सुरक्षित करू शकता. हे मेसेज एका विशिष्ट कालावधीनंतर आपणच गायब होतात. याशिवाय हे क्लाउड मेसेजवर संग्रहित देखील होत नाहीत. याचा फायदा असा की क्लाउड मेसेजवर जरी हॅकर्स पोहोचले तरी त्यांनी तुमच्या खासगी गोष्टी मिळू शकणार नाहीत.


सर्व युझर्सनी एन्ड टू एन्ड सबस्क्रिप्शनचा उपयोग करणं आवश्यक आहे. यामुळे हॅक करणं अधिक कठीण होईल. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड LOCAL बॅकअप करण्यासाठी उपयोगी ठरत आहे.  Google ड्राइववर E2EE बॅकअपही युझर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे युझर्स हे फीचर देखील वापरू शकतात. भविष्यात बॅकअप चॅट सुरक्षित कऱण्यासाठी अधिक फीचर्सही आणले जातील असं सांगण्य़ात आलं आहे. 


WABetaInfo ने टेस्टिंगमध्ये केवळ एन्ड टू एन्ड सब्स्क्रिप्शनवरच भर दिला होता. WhatsAppने बॅकअप अनलॉक करण्यासंदर्भात आणि बॅकअप अधिक सुरक्षित ठेवण्यासंदर्भात काम करत आहे. येत्या काळात त्यासंदर्भातील काही फीचर अपडेट्ससाठी येतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. 


या चुका टाळा


तुमचे कोणतेही बँक डिटेल्स, मोबाईल किंवा कोणतेही पासवर्ड सध्यातरी व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू नका. कोणतीही खासगी माहिती किंवा डिटेल्स व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करणं धोक्याचं ठरू शकतं. whatsappकडून येणारे वेळोवेळीचे अपडेट्स हे आपल्या अॅपमध्ये अपडेट करत राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन्ड टू एन्ड सब्स्स्क्रिबशन ठेवा. त्यामुळे तुमचं चॅट अधिक सुरक्षित राहील.