मुंबई : WhatsApp आणि Messenger हे जगभरात सर्वाधिक वापरले जाते. पण कधी कधी WhatsApp आणि Messenger च्या सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे डोकेदुखी वाढली आहे. यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही याला म्यूट करू शकता, जाणून घ्या डिटेल्स. WhatsApp किंवा Messenger ला म्यूट करण्याची सोपी ट्रिक समजून घ्या. (whatsapp notification)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Messenger वरील चॅटला असे म्यूट करा 


 -  स्मार्टफोनमधील फेसबुक मेसेंजर ॲप वर जा. त्यानंतर चॅटवर जा. ज्याला तुम्हाला म्यूट करायचे आहे.
 - आता या चॅटवर लाँग प्रेस करा. यात म्यूट नोटिफिकेशन्सचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.
 - आता तुम्हाला म्यूट मेसेज नोटिफिकेशन्स, म्यूट कॉल नोटिफिकेशन्स, म्यूट मेसेज आणि कॉल नोटिफिकेशन्स ऑप्शन दिसतील.
 - यात कोणत्याही मेसेजला सिलेक्ट केले जावू शकते. तसेच फेसबुक मेसेंजरवर मेसेज किंवा कॉल्सचा आवाजाचे नोटिफिकेशपासून सुटका करता येवू शकते.


याशिवाय, मेसेंजरवर इग्नोर मेसेज असा एक ऑप्शन येतो. या ऑप्शनसाठी चॅटवर लाँग प्रेस दाबायचा असतो. जर यूजर या ऑप्शनचा वापर करीत असेल तर यूजरला कोणतेही नोटिफिकेशन मिळणार नाही. किंवा पाठवलेले मेसेज डिलिव्हर होणार नाहीत. ज्यावेळी तुम्ही कोणत्याही चॅटला ओपन कराल. त्यावेळी आधीचे मेसेज पाहू शकता.



WhatsApp चॅट्सला असे म्यूट कराल


- WhatsApp ला ओपन करून चॅटवर जा. ज्याला तुम्हाला म्यूट करायचे आहे.
- या चॅटवर टॅप करून तुम्ही म्यूट ऑप्शन पाहू शकता. जे डिलिट ऑप्शन जवळ दिसेल.
- म्यूट ऑप्शनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. एक तास, एक आठवडा आणि ऑलवेज.
- ऑलवेज वर टॅप केल्यानंतर नेहमीसाठी चॅट म्यूट होईल.


तसेच Messenger आणि WhatsApp शिवाय, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम प्लॅटफॉर्मला सुद्धा म्यूट मेसेज आणि म्यूट कॉलचे ऑप्शन मिळते. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर म्यूट मेसेज आणि कॉलची पद्धत Messenger आणि WhatsApp सारखीच आहे.