WhatsAppचे जबरदस्त फीचर, आता हाय क्वालिटी फोटो शेअर करणे शक्य
या आश्चर्यकारक फीचरसह, यूझर्सना फोटोंच्या संदर्भात बरीच मदत मिळेल.
मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्सना नवीन अनुभव देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आता व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. ज्या अंतर्गत यूझर्स हाय रिझोल्यूशन फोटो पाठवण्यात सक्षम असतील आणि ते देखील फोटोची किंवा व्हिडीओची क्वालिटी खराब न होता. सध्या आपण व्हॉट्सअॅपवरुन फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना त्याची क्वलिटी खराब होते, ज्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय निवडायला लागत होता. यामुळे व्हॉट्सअॅपने हे फीचर आणण्याचे ठरवले आहे.
या आश्चर्यकारक फीचरसह, यूझर्सना फोटोंच्या संदर्भात बरीच मदत मिळेल. या फीचरबद्दल तपशीलवार माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
हे फीचर Android यूझर्ससाठी
WABetaInfoच्या अहवालानुसार व्हॉट्सअॅप आपल्या Android फोन यूझर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे. व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.21.14.6 मध्ये एक फीचर येत आहे, जे व्हिडीओची गुणवत्ता खराब होण्यापासून वाचवते. या फीचरमुळे, यूझर्स हाय रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ शेअर करु शकतात किंवा एकमेकांना पाठवू शकतात.
अहवालानुसार, लेटेस्ट वर्जनमध्ये व्हिडीओ, फोटोचे अपलोड कम्प्रेशन ठरवण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असतील, ज्यात ऑटो, बेस्ट क्वालिटी आणि डेटा सेव्हरचा समावेश आहे.
तुम्हाला तीन पर्याय मिळतील
'Auto ऑप्शन' हा डेटा स्लो असल्यामुळे व्हिडीओ कॉम्प्रेस फाइल स्वरूपात पाठवेल. 'Data Saver' पर्याय त्या युझर्ससाठी आहे जे इतर यूझर्सना व्हिडीओ पाठवू इच्छित आहेत, परंतु या प्रक्रियेत त्यांना त्यांचा मासिक डेटा सेव्ह करायचा आहे. यूझर्सना "Best Quality" या पर्यायची प्रतीक्षा करावी लागेल, ज्याद्वारे यूझर्स त्यांच्या गॅलरीतून व्हिडीओची गुणवत्ता कमी न करता आणि फाइल कंप्रेस न करता थेट पाठवू शकतात. परंतु हे फीचर येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो परंतु हे फीचर लवकरच येणार.