WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता युजर्संना कुणालाही न कळता ग्रुपमधून बाहेर पडता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म या नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे ग्रुपमध्ये राहायचा कंटाळा आलेल्या युजर्संना फायदा होणार आहे. आता ग्रुपमधून बाहेर पडल्यावर तिथे Left असं येतं. त्यामुळे ग्रुपमधील सदस्यांना लेफ्ट झाल्याचं कळतं आणि नाराज असल्याने ग्रुप लेफ्ट केल्याची चर्चा रंगते. अनेकदा युजर्स फोन करून करून विचारणा करतात. तर काही जणांना पुन्हा ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं जातं. मात्र नव्या फीचरमुळे ही कटकट संपणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि डेस्कटॉप युजर्ससाठीही उपलब्ध असेल. रोल आउट केल्यास, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा सदस्य ग्रुप सदस्यांना न कळताच शांतपणे ग्रुपमधून बाहेर पडू शकतो.  हे WABetaInfo ने देखील सूचित केले होते की, जर सदस्य बाहेर पडला तर फक्त ग्रुप अ‍ॅडमिनला सूचित केले जाईल.


या फीचरवर काम सुरु


व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवरही काम करत आहे. यामुळे एखाद्या विशिष्ट ग्रुपमधील मागील सहभागींना पाहता येईल. याची चाचणी अँड्रॉइड बीटावर केली जात आहे. मागील सहभागींना पाहण्याची क्षमता ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी उपलब्ध असेल की फक्त ग्रुप अ‍ॅडमिनसाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


व्हॉट्सअ‍ॅपवर एडिट बटणही लवकरच येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता यूजर्सना मेसेज पाठवल्यानंतर एडिट करू देणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने पाच वर्षांपूर्वी या फीचरवर काम करण्यास सुरुवात केली होती. अखेर, पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर, व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एडिट फीचरवर काम करण्याचा विचार केला आहे.