Whatsapp कडून गुपचूप धमाकेदार फीचर लाँच, पाहा काय होणार बदल
Whatsapp युजर्ससाठी मोठी बातमी, मोठ्या संकटातून वाचवणार Whatsapp चं हे नवीन फीचर
मुंबई : ऑफिसपासून ते कॉलेजपर्यंत आणि अभ्यासापासून ते टाइमपासपर्यंत आज प्रत्येकजण Whatsappचा वापर करतो. Whatsapp नेहमीच आपल्या युजर्ससाठी अधिक फ्रेन्डली आणि उत्तम फीचर्स आणत असतं. याशिवाय युजर्सच्या सेफ्टीचाही विचार सातत्याने करत असतं. आता आणखी एक फीचर गुपचूप Whatsapp ने लाँच केलं आहे. याचा थेट आपल्याला फाय़दा होणार आहे.
Whatsapp चे हे नवीन फीचर तुम्हाला संकटातून वाचवू शकतं. या नवीन फीचरचा तुमच्यावर कसा थेट परिणाम होणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. WhatsApp ने मंगळवारी हे फीचर लाँच केलं आहे. या नव्या फीचरमध्ये आता युजरला व्हॉइस मेजेस पाठवण्याआधी पुन्हा पाहता येणार आहे.
नव्या फीचरनुसार आता तुम्हाला व्हॉइस मेसेज प्रीव्ह्यू करता येणार आहे. तुम्ही पाठवत असलेला व्हॉइस मेजेस तुम्ही पुन्हा ऐकू शकता आणि त्यानंतर तो पाठवू शकता. हे फीचर तुम्हाला वैयक्तीक आणि ग्रूप चॅटसाठी देखील वापरता येणार आहे. हे फीचर अॅन्ड्रॉईड, iOS आणि वेब किंवा डेस्कटॉपसाठी लाँच करण्यात आलं आहे.
आपल्याकडून खाद्या व्हॉइस मेसेज जर चुकून सेंड होत असेल तर तुम्हाला प्रीव्ह्यूचा (WhatsApp Voice Message Preview Feature) पर्याय मिळेल. त्यानंतर तुम्हाला तो पाठवायचा की नाही हे निश्चित करता येईल. त्यामुऴे तुम्ही मोठ्या संकटातून वाचू शकता. या फीचरचा फायदा लाखो युजर्सना होणार आहे.
Whats app चा स्क्रीनशॉट घेताय सावधान ! स्क्रीनशॉट घेतल्यास तीन ब्लू टीक येणार
जर तुमच्याकडून एखादं रेकॉर्डींग झालं आणि तुम्हाला ते पाठवायचं नाही तर तुम्ही ट्रॅश कॅन पर्यायवर क्लीक करून ते हटवू शकता. जर तुम्ही सेंड पर्याय निवडला तर तुम्ही ज्या युजरला पाठवणार आहात त्याला व्हॉइस मेसेज सेंड होईल.
जर तुम्ही WhatsApp वर व्हॉइस मेसेज पाठवण्यावर अधिक भर देत असाल तर तुमच्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे. जर तुमच्याकडून मायक्रोफोन बटणावर चुकून हात गेला आणि काही मेसेज रेकॉर्ड झाला जो तुम्हाला पाठवायचा नाही. तर तो प्रीव्ह्यूमधून पुन्हा डीलिट करता येऊ शकतो.
फक्त १ रुपयात Jio चा भन्नाट प्लॅन लॉंच; ३० दिवसांची वैधता तसेच इतर अनेक फायदे
तुम्ही मायक्रोफोनवर क्लीक करून वर लॉक दिसत असेल तिथे स्लाइड करायचं आहे. तिथे स्लाइड केल्यानंतर एक खाली छोटी विंडो दिसेल तिथे तुम्ही मेसेज रेकॉर्ड करायचा. त्यानंतर स्टॉब बटनावर क्लीक करायचं. आपल्याला हा मेसेज पाठवायचा असेल तर सेंड आणि नसेल पाठवायचा किंवा त्यामध्ये काही चुकलं असेल तर डाव्या बाजूला डीलिटचा पर्याय निवडू शकता.
हे पहिल्यांदा व्हॉट्सअॅपवर बीटा WABetaInfo व्हर्जनमध्ये वापरण्यात आलं होतं. त्यानंतर आता वेब आणि इतर Whatsapp वर हे फीचर वापरता येणार आहे.