मुंबई: Whatsapp नेहमीच आपल्या युझर्ससाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सोयी अधिक फ्रेंण्डली कशा होतील यावर लक्ष केंद्रीत करतं. आता Whatsapp ने गुगल पे आणि पेटीएमला टक्कर देण्यासाठी Whatsapp pay देखील सुरु केलं आहे. आता आणखी एक फीचर कंपनी सुरू करत आहे. लवकरच तुमच्यापर्यंत हे येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे रेस्टॉरंट आणि दुकानं शोधण्यासाठी प्रत्येकवेळी गुगल मॅपची आवश्यकता लागणार नाही. याचं कारण म्हणजे Whatsapp हे शोधून देण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. Whatsapp उघडून तुम्ही तुमच्या जवळचे रेस्टॉरंट दुकानं, किराणा दुकानाची माहिती Whatsapp वर मिळणार आहे. 


सध्या हे फीचर ब्राझिलमध्ये काही लोक वापरत आहेत. याचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ते लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. Whatsapp ट्रॅकरच्या मदतीनं तुम्ही आजूबाजूच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, किराणा दुकानं अशी तुम्हाला हवी ती ठिकाणं शोधू शकता त्यासाठी तुम्हाला Whatsapp मधून बाहेर वेगळं अॅप घेण्याची गरज नाही. 


Whatsapp ने व्हिडीओ कॉलिंग, व्हॉईस प्रीव्ह्यू आणि Whatsapp पे अशी काही उत्तम फीचर्स लाँच केली. त्याला युझर्सचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता नवे इमोजी आणि GIF याशिवाय Whatsapp ट्रॅकर सारख्या सुविधांवर कंपनी काम करत असून लवकरच हे फीचर्स तुमच्या फोनवरही येतील अशी आशा आहे. मात्र त्यासाठी युझर्सना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.