Whatsapp Scam : व्हॉट्सअॅपचा (Whatsapp) जगभरात कोट्यवधी लोक वापर करतात. तसेच व्हॉट्सअॅप सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लागोपाठ नवीन फीचर्स येत आहेत. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप युजर्सला चांगली सेवा देता यावी यासाठी नवीन नवीन अपडेट जारी करण्यात येते. सेफ्टी, खासगी यासारखे असंख पर्याय या अॅप्समध्ये आहेत. त्यातच आता WhatsApp वर स्कॅमर्स विविध पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असून आता नवा स्कॅम 'Rs. 50 per like' सुरू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भारत सरकारने व्हॉट्सऍपवर (Whatsapp Call) व्हिडिओ कॉलद्वारे (Video Call) हॅकर्सच्या हल्ल्याचा इशारा दिला होता. आयटी मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (SERT-In) व्हॉट्सऍप वापरकर्त्यांसाठी हा इशारा जारी केला होता. त्यातच आता व्हिक्टिमने मेसेजला रिप्लाय देताच, स्कॅमर त्यांना कॉल करतात आणि YouTube व्हिडिओ लाइक करण्यासाठी पैसे दिले जातील, असे सांगतात. एवढेच नाही, तर व्हिक्टिमला विश्वास बसावा यासाठी ते सुरुवातीला काही अमाउंट देखील देतात. 


वाचा: High cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश 


यावर, व्हिक्टिमचा विश्वास जिंकल्यानंतर, ते त्यांना पेमेंट ट्रान्सफरमध्ये काही समस्या येत असल्याचे सांगून, सहजपणे पेमेंट ट्रान्सफर व्हावे यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. परिणामी या अ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. या स्कॅमपासून सुरक्षित राहणेही अत्यंत सोपे आहे. यासाठी आपल्याला केवळ अशा मेसेजसकडे दुर्लक्ष करायचे आहे.