High cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता. 

Feb 19, 2023, 15:56 PM IST
1/5

फॅटी मासे

मांसाहारी लोकं देखील कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. हार्वर्डने म्हटले आहे की, आठवड्यातून २ ते ३ वेळा फॅटी मासे खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड आणि एलडीएलची पातळी कमी होऊ शकते. 

2/5

राजमा

राजमा, कडधान्ये वगैरे खाल्ल्यावरही नसा संकुचित होण्यापासून संरक्षण मिळू शकते. कारण त्यात विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील घाणेरडे पदार्थ वेगळे करून ते बाहेर काढते. 

3/5

फळे खा

उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी फळांचे सेवन करणे चांगले. तुम्ही सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरी सारखी आंबट फळे खाऊ शकता. त्यात पेक्टिन नावाचा घटक असतो, जो विद्राव्य फायबरचा एक प्रकार आहे.

4/5

वांगी आणि भेंडी

शाकाहारी लोकांसाठी कोलेस्टेरॉल कमी करणारे भरपूर पर्याय आहेत. वांगी आणि भेंडीचे नियमित सेवन केल्यानेही हा चिकट पदार्थ निघून जातो. या दोन्ही गोष्टींमध्ये विरघळणारे फायबर देखील असते. 

5/5

ओट्स

ओट्स खाणे हा उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. न्याहारीसाठी एक वाटी ओट्स खाल्ल्याने 1 ते 2 ग्रॅम विद्रव्य फायबर मिळते. त्यात केळी मिसळल्याने फायबरचे प्रमाण वाढते आणि घाण साफ होण्यास मदत होते.