मुंबई : व्हाट्सअपने दुसरा कंप्लायंस रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीने 16 जून ते 31 जुलै 2021 दरम्यानच्या 30 लाखाहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बंद केले आहेत. IT नियमांना फॉलो करत कंपनीने दुसरा रिपोर्ट सादर केला. एका अभ्यासानुसार व्हाट्सअपने 30 लाख 27 हजाराहून अधिक व्हाट्सअप अकाऊंट बंद केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाट्सअपने म्हटले आहे की, 95 टक्क्याहून अधिक बॅन ऑटोमेटेड  किंवा बल्क मॅसेजिंगचा चुकीचा वापर करण्याच्या कारणावरून करण्यात आले आहेत. ग्लोबल एवरेजवर चुकीच्या पद्धतीने अकाऊंट वापरल्यामुळे 80 लाखाहून अधिक अकाऊंट बॅन करण्यात आले आहेत.


16 जून ते 31 जुलैच्या दरम्यान, व्हाट्सअप अकाऊंट सपोर्ट (137), बॅन अपील (316), अन्य सपोर्ट (45), प्रोडक्ट सपोर्ट(64) आणि सेफ्टी (32), मध्ये 594 युजर्स रिपोर्ट मिळतेय. या टाइम पीरियडमध्ये व्हाट्सअपने अशा अकाऊंटवर कारवाई केली आहे.  


कारवाईचा अर्थ एखाद्याचे अकाऊंट बंद करणे होय. किंवा आधी मिळालेल्या तक्रारीवरून अकाऊंट बॅन केलेले दाखवणे.


व्हाट्सअपच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की,  मागील काही वर्षात प्लॅटफॉर्मवर आपल्या युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजंन्सवर आणि अन्य तंत्रज्ञानावर गुंतवणूक केली आहे. आयटी नियम 2021 नुसार आम्ही 46 दिवसात दुसरा मासिक रिपोर्ट जारी केला आहे.