मुंबई : तुम्ही व्हॉट्सअप (Whatsapp) वापरत असाल तर सावध राहा. कारण तुमचा व्हॉट्सअप सुरक्षित असेलच असं नाही. कारण व्हॉट्सअपमध्ये खतरनाक व्हायरसचा शिरकाव झालाय. भारतीय सायबर एजंसी सीईआरटी-आयएन या व्हायरसबाबत इशारा दिलाय. या व्हायरसमधून मोबाईलमधील डाटा चोरला जाऊ शकतो अशी भीतीही सायबर एजन्सीनं व्यक्त केलीय. त्यांनी नेमका काय इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायबर गुन्हेगार एका व्हिडिओ फाईलमधून व्हॉट्सअॅपमध्ये व्हायरस पाठवतात. ही व्हिडिओ फाईल ओपन करताच हा व्हायरस मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो. त्यामुळे सायबर गुन्हेगार मोबाईल बँक आणि इतर महत्त्वाच्या डिटेल्सवर डल्ला मारण्याची भीती आहे.


व्हॉट्सअप युजर्सनी काळजी घेण्याचं आवाहन सीईआरटी-आयएननं केलंय. त्यामुळे व्हॉट्सअपवर अनोळख्या नंबरवरून आलेल्या व्हिडिओ फाईल ओपन करू नका. अन्यथा तुमच्या मोबाईलमधला सर्वच डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती गेलाच म्हणून समजा.