नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची स्पॅम मेसेजपासून सुटका करण्यासाठी कंपनीने पूर्ण तयारी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड इव्हिनिंग’च्या मेसेजेसने वैतागलेले असतात. यूजर्सची अशा मेसेजेसपासून सुटका करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवं फीचर टेस्ट करत आहे.  


काय आहे अ‍ॅपचा फायदा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरची खासियत म्हणजे हे फीचर यूजरला फॉरवर्ड मेसेजची माहिती देणार. यूजर्स सहज ही माहिती घेऊ शकणार की, मेसेज कुणाकडून टाईप करण्यात आलाय की, दुस-याच्या चॅटमधून कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड केला जातोय. जे मेसेज फॉरवर्ड केले जातील त्यावर 'Forwarded Message' असं लिहिलेलं असेल. 


बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध


WABETaInfo यांनी हे फीचर स्पॉट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन २.१८.६७ मध्ये मिळेल. यासोबतच हे फीचर विंडोजमध्येही दिसेल. हे फीचर आल्यानंतर तुमची रोज मिळणा-या ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड इव्हिनिंग’सारखे फॉरवॉर्डेड मेसेजेसपासून सुटका होईल. 


विंडोजनंतर अ‍ॅन्ड्रॉईडसाठी स्टीकर लॉन्च


व्हॉट्सअ‍ॅपने विंडोजनंतर अ‍ॅन्ड्रॉईडसाठी स्टीकर फीचर बीटा व्हर्जनवर जारी केलं आहे. फॉरवॉर्डेड मेसेज ट्रॅकींग आणि स्टीकर फीचरला बाय डिफॉल्ट डिसेबल ठेवलं गेलं आहे. WABETaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, जर आता कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप यूजरला फॉरवर्डेड मेसेज आले तर त्याची त्यांनी माहिती मिळेल. 


बीटा व्हर्जनवर ग्रुप डिस्क्रिप्शनचं नवं फीचर


या दोन फीचर्स व्यतिरीक्त व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्ड्रॉईड आणि विंडोजसाठी बीटा व्हर्जनमध्ये ग्रुप डिस्क्रिप्शनचं सुद्धा फीचर देण्यात आलंय. हे फीचर इनेबल करण्याची गरज नाही. हे फीचर आपोआप प्रत्येक यूजर्सना दिसणार. डिस्क्रिप्शन फीचरमध्ये ग्रुपचा कोणताही सदस्य ग्रुपचं डिस्क्रिप्शन एडिट करू शकतो. डिस्क्रिप्शनची सीमा ५०० शब्द ठरवण्यात आली आहे. 


आयफोन यूजर्ससाठी नवं फीचर


गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या आयफोन यूजर्ससाठी नवीन फीचर सुरू केलंय. या फीचरनुसार आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेल्या व्हिडिओंसाठी यूट्यूब ओपन करावं लागणार नाही.