WhatsApp Tips And Tricks News In Marathi : सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप व्हॉट्स ऍपमध्ये एक भारी ट्रिक्स आहेत, ज्यातील बऱ्यात आपल्याला माहितही नाही. आपल्यापैकी बहुतेकजण whatsapp हे मेसेजिंग वापरतो. सर्वाधिक वापरलं जाणारं हे इन्स्टंट मेसिंग ॲप असून याच्या अनेक फीचर्सबद्दल आपल्याला माहिती नाही. जसेकी अनेकदा व्हॉट्स ऍपवर एखादा युजर दुसऱ्या युजरला ब्लॉक करतो. त्यामुळे संबंधित युजर त्याला कोणताच मेसेज कॉल Whatsapp द्वारे करु शकत नाही. पण अशा काही सोप्या टिप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे? तसेच तुम्ही स्वत: ला कशाप्रकारे अनब्लॉक करु शकता ते जाणून घ्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर आपण कोणाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं किंवा कोणीही आपल्याला ब्लॉक तर दोन्ही कॉन्टॅक्ट एकमेंकांना मेसेज पाठवू  शकत नाही. तसंच कॉलिंग, स्टेटस शेअरिंग यापैकी काहीही होणार नाही. तसंच ज्या व्यक्तीने समोरच्याला ब्लॉक केलं आहे, तो त्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटो किंवा डीपी पाहू शकत नाही. त्या व्यक्तीचे ऑनलाइन स्टेटस किंवा ब्लू टिकू दिसणार नाही. 


जर तुमचा मित्र किंवा कोणीही तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असा संशय आला तर तुम्हाला आधी त्याची ऑनलाईन स्थिती आणि लास्ट सीन चेक करावे लागेल. हे दोन्ही तुम्हाला आधी दिसत असेल आणि नंतर  नाही तर कदाचीत तुम्ही ब्लॉक झाले आहेत. पण हो याचा अर्थ असा नाही की त्याने  तुम्हाला ब्लॉक केले आहे याची 100%  गॅरंटी नाही, कदाचित त्या व्यक्तिने हे दोन्ही पर्याय त्याच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये लपवले असतील.  तसेच मेसेज सेंड झाल्यावर डबल टिक्स आणि ब्लू टिक्स दिसतच नसतील, तर समजा त्या व्यक्तीने  तुम्हाला ब्लॉक केलले आहे. 


या सोप्या ट्रीक फॉलो करा -


  1. यासाठी प्रथम तुमचे व्हॉट्सअॅप खाते उघडा आणि नंतर त्याच्या सेटिंग्जमध्ये जा.

  2. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटवर क्लिक करा. जिथे तुम्हाला Delete My Account चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.

  3. त्यानंतर तुम्हाला देशाचा कोड आणि मोबाईल नंबर टाकून पुन्हा व्हॉट्सअॅपमध्ये लॉग इन करावे.

  4. खाते लॉग इन करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करा, तुमचे खाते पुन्हा तयार केले जाईल.

  5. त्यानंतर तुम्हाला आपोआप अनब्लॉक केले जाईल. ज्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे, त्याला मेसेज किंवा व्हॉट्सअॅप कॉल करू शकाल.

  6. मात्र, तुम्ही खाते हटविल्याशिवाय स्वतःला अनब्लॉक करू शकत नाहीत.