मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप असे एक असे मेसेजिंग अ‍ॅप आहे, ज्याचा वापर भारतात सर्वाधिक केला जातो. जर आपल्याला एखाद्यास वैयक्तिला संदेश पाठवायचा असेल किंवा ऑडिओ- व्हिडिओ कॉल करायचा असेल तर लोकं ते व्हॉट्सअ‍ॅपवरुन करतात. आपला साथीदार, मित्र आणि कुटूंबाशी संपर्कात राहण्यासाठी देखील आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. परंतु व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नेहमीच काही ना काही फीचर्स अ‍ॅड होत असतात. ज्याची माहिती आपल्याला नसते. परंतु तुम्हाला हे अ‍ॅप वापरण्यासाठी काही माहिती असणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अ‍ॅपच्या काही छुप्या फीचरबद्दल आम्ही सांगणार आहोत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा जोडीदार सर्वाधिक कोणाशी बोलतो हे तुम्ही शोधून काढू शकता. म्हणजेच तुमच्या जवळची व्यक्ती कोणत्या व्यक्तीबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर जास्त काळ बोलते हे तुम्हाला समजू शकते.


व्हॉट्सअ‍ॅपवर बरेच ग्रुप तयार केले जातात यामध्ये कुटुंबातील वेगवेगळे ग्रुप, मित्रांचा वेगळा ग्रुप, ऑफिसचा वेगळा ग्रुप आणि शाळेतील मित्रांचा एक ग्रुप. अशा आपल्या गप्पा चालू असतात. त्यामुळे समोरील व्यक्ती कोणत्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर किंवा व्यक्तीबरोबर सर्वाधिक चर्चा करता हे जाणून घेणे अवघड होते.


परंतु यासाठी तुम्हाल तुमच्या जोडीदाराच्या फोनचा पासवर्ड माहित असणे गरजेचे आहे, त्यानंतरच तुम्ही त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप तपासू शकता आणि ते कोणाशी अधिक बोलतात हे शोधू शकता. चला कसे ते जाणून घेऊया ...


चार चरणांसह हे जाणून घ्या:
1. प्रथम आपण व्हॉट्सअ‍ॅप उघडून त्यावर दर्शविलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
२. तेथून सेटिंग्जवर क्लिक करा, जिथे तुम्हाला बरेच पर्याय दिसतील.
3. तेथे तुम्हाला स्टोरेज अँड डेटा नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
4. तो उघडल्यानंतरही तुम्हाला बरेच पर्याय दिसतील, तिथे तुम्हाला मॅनेज स्टोरेजवर क्लीक करावे लागेल.
5 त्यावर क्लिक केल्याने, तुमच्यासमोर संपूर्ण यादी दिसेल.
6. त्या लिस्टमध्ये सुरवातीला दिसण लोकांशी किंवा ग्रुपवर तो व्यक्ती सर्वाधिक चर्चा करतो.