Whatsapp बनणार इन्स्टाग्राम...नव्या फीचरमध्ये नेमकं काय?
Whatsapp इन्स्टाग्रामसारखं बनणार म्हणजे नेमकं काय बदलणार? युझर्सला त्याचा नेमका फायदा काय?
मुंबई: संवाद साधण्याचं सर्वात सोपं आणि आपलंसं वाटणारं माध्यम म्हणजे Whatsapp. अगदी ऑफिसपासून ते मित्र-मैत्रिणींसोबत तासंतास गप्पा मारायला सध्या त्याच माध्यमाचा सर्वात जास्त वापर होतो. अनेकदा याचा सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र एन्ड टू एन्ड सब्स्क्रिप्शनचा वापर करून सर्वजण हे माध्यम वापरणं सोयीचं समजतात. Whatsapp देखील सतत नवीन फीचर्स युझर्ससाठी आणण्याचा प्रयत्न करत असतं.
व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी खास इन्स्टाग्रामसारखं फीचर आणलं आहे. इन्स्टाग्राम फीचर सारखं हे नवीन फीचर आहे. हे फीचर चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये सतत होणारे अपडेट्स. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप एक अपडेट घेऊन येत आहे जे युझर्सना इंस्टाग्रामच्या वैशिष्ट्यासारखं बरेच फीचर्स त्यामध्ये असतील.
व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट प्रामुख्याने व्हॉट्सअॅपवरील 24 तासांच्या स्टेटशी संबंधित आहे. वेब डेटाने दिलेल्या माहितीनुसार या अपडेटनंतर, युझर्स व्हॉट्सअॅपवर सध्या स्टेटस ठेवल्यावर पुन्हा ते एडिट करू शकत नाहीत. मात्र नव्या अपडेटनुसार त्यांना ते पुन्हा एडीट करण्याचा पर्याय मिळणार आहे. स्टेटस अपडेट झालं की तिथे तुमचा प्रोफाईल फोटो आणि हायलाइट दिसेल.
यासोबत आता खास स्टिकर्सही आणले आहेत. टायपिंगसोबत स्पेसनंतर युझर्सचा पर्यायही शब्दांसोबत मिळेल असं सांगितलं जात आहे. म्हणजेच वेगवेगळे स्टिकर्स युझर्सला वापरायला मिळणार आहे. त्याचा फायदा चॅटिंगसाठी होऊ शकतो.