Whatsapp Update: व्हॉट्सअ‍ॅप हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झाला आहे. आपली अनेक दैनंदिन कामे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (WhatsApp) केली जातात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपची कामगिरी आणि त्याच्या सुविधा यावर सर्वांचे लक्ष असते. पण अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या अनोळखी स्पॅम कॉल्स किंवा अनोळखी कॉल्समुळे आपल्याला थोडा त्रास होतो. अशा परिस्थितीत हे अनावश्यक कॉल किंवा मेसेजेस कसे ब्लॉक करायचे हा प्रश्न पडतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर व्हॉट्सअ‍ॅप दिले असून व्हॉट्सअ‍ॅपने (whatsapp new features) तुमच्यासाठी फार उपयुक्त फीचर आणले आहेत. ज्याच्यामुळे तुम्ही स्पॅम कॉल आणि संदेश ब्लॉक करणे शक्य होईल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी अशाच एका फीचरवर काम करत आहे. ज्याच्या मदतीने युजर्स अनोळखी नंबर किंवा स्पॅम कॉल्सपासून मुक्त होऊ शकतात. नवीन फीचरमुळे यूझर्सना सेव्ह न केलेल्या कॉन्टॅक्ट्समधील कोणताही कॉल सायलेंट करता येईल.  हे फीचर सध्या अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपसाठी विकसित केले असून लवकरच ते चाचणीसाठी दिले जाण्याची शक्यता आहे.   


वाचा: तुम्हाला माहितीय का? होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन का साजरे करतात? 


व्हॉट्सअॅप वापरकर्ते अॅप सेटिंग्जमध्ये जाऊन "सायलेंस अननोन कॉलर" (Silence Call from Unknown Callers) फीचर चालू करू शकणार आहेत. हे फीचर चालू केल्यावर अनोळखी नंबरवरील सर्व कॉल्स सायलेंट होतील. पण, नोटिफिकेशन बारमध्ये यूजर्सला कॉलबद्दल सूचित केले जाईल. अशा प्रकारे, स्पॅम कॉल टाळण्यासाठी एखाद्याला सर्व सूचना किंवा WhatsApp वरील कॉल म्यूट करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर जर वापरकर्त्यांला एखाद्या नंबरबद्दल आवश्यक वाटत असेल तर तो त्या नंबरवर कॉल बॅक देखील करू शकेल. याशिवाय, व्हॉट्सअॅप वापरकर्त्याचा नंबर सर्वत्र दिसत नसला तरीही हे फीचर काम करू शकते. व्हॉट्सअॅपने अद्याप अशा फीचरबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.