मुंबई: जगाच्या कानाकोपऱ्यात राहून एकमेकांशी अगदी सहजपणे संवाद साधता येणं आणि प्रत्येक गोष्ट शेअर करणं हे Whatsapp मुळे अगदी सहज शक्य झालं आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क करण्याचं अगदी सोपं साधन म्हणजे Whatsapp आहे. मित्रांपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत अनेक गोष्टी आपण यावर शेअर करत असतो. मात्र आजही अनेक जण गोल्ड Whatsapp किंवा इतर थर्ड पार्टी Whatsapp चे अॅप वापरतात कारण त्यामध्ये अधिक चांगले फीचर्स मिळतात असा युझर्सचा दावा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा अॅपपासून मूळ Whatsapp कडे आणण्यासाठी कंपनी आपल्या मूळ अॅपमध्ये नवीन फीचर्स लाँच करण्यात आले आहेत.Whatsappने काही नवीन अपडेट जारी केले आहेत. ज्यामुळे युझर्सना अनेक नवीन वैशिष्ट्यांचा लाभ घेण्याची संधी मिळेल. येत्या काळात व्हॉट्सअॅप आणखी अनेक नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यापैकी सर्वात इंन्ट्रेस्टिंग फीचर कोणते 5 असणार आहेत ते आज जाणून घेऊया. 


जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करता, तेव्हा ते खूपच कम्प्रेस होतात, ज्यामुळे त्यांची क्वालिटी आणि रिझोल्यूशन खराब होतं. अशा वेळी व्हॉट्सअॅपकडून एक अपडेट देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये आपण 'बेस्ट क्वालिटी', 'डेटा सेव्हर' आणि 'ऑटो' या तीन मोडमधून आपल्या फोटो आणि व्हिडिओंची गुणवत्ता निवडू शकता.


डिसपीयरिंग चॅट्स फीचर लवकरच दिसण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये वन-ऑन-वन आणि ग्रुप चॅट्स काहीवेळानंतर गायब होतात. हे फीचर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन तिथे हे फीचर सुरू किंवा बंद करू शकणार आहात. 


लास्ट सीन, प्रोफाइल फोटो स्टेटस आणि कोणी मेसेज वाचले या चारही गोष्टींसाठी तुम्ही आता तुमचे मित्रपरिवार, सर्वजण किंवा कोणीही नाही असे पर्याय निवडू शकणार आहात. हे फीचर सध्याही आपल्या व्हॉट्सएपमध्ये आहे. तर येत्या काळात स्टेटस अपलोडमध्ये काही बदल करण्यात येण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय व्हॉइस मेसेज आणि व्हिडीओ पाठवण्यासाठी देखील नवीन अपडेट मिळण्याची शक्यता आहे. 


आता स्टीकरमध्ये तुम्हाला कार्टुन किंवा नुसतेच काही चेहरे दिसत आहेत. पण येणाऱ्या काळात विशिष्ट स्टार्स किंवा आपल्या मित्र-मैत्रीणींचे फोटो देखील स्टिकर्स म्हणून वापरता येऊ शकतील. अशा फीचर्सवर काम सुरू असल्याची चर्चा आहे. हे फीचर कधी येणार याबाबत Whatsapp कडून कोणतीही अधिकृत माहिती सध्या तरी देण्यात आली नाही. 


लवकरच, तुम्ही WhatsApp वर तुमच्या ग्रुप चॅट आयकॉनमध्ये इमोजी किंवा स्टिकरसह चित्र बदलू शकाल. लवकरच, तुम्ही तुमच्या ग्रुप चॅटसाठी ग्रुप आयकॉन डिझाईन करू शकणार आहात. ज्यात तुमच्याकडे चित्र नसताना तुम्ही स्टिकर किंवा इमोजी बॅकग्राउंड कलरसह वापरू शकता.