मुंबई: Whatsapp सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक वेगवेगळे अपडेट्स आणत आहे. अधिक सुरक्षित आणि अधिक सोयीचं संवाद साधण्याचं माध्यम म्हणून Whatsapp सतत्याने आपल्या अॅपमध्ये देखील बदल करत आहे. आता सुरक्षेच्या सिस्टिमच्या दृष्टीने विचार करता दिवाळीआधी युझर्ससाठी वाईट बातमी आहे. 10 दिवसांनंतर काही फोनमध्ये Whatsapp चालणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 नोव्हेंबरपासून या मोबाईलमध्ये Whatsapp बंद होणार आहे. फेसबुकने यासंदर्भात एक घोषणा केली आहे. अॅन्ड्रॉइड  4.0.4 वापरणाऱ्या मोबाईल फोनमधील Whatsapp बंद करण्यात येणार आहे. काही डिव्हाइसना आपलं अॅन्ड्रॉइड अपडेट करता येऊ शकतं त्यांनी ते अपडेट करावं. अन्यथा त्यांचं व्हॉट्सअॅप बंद होऊ शकतं. 


4.1 आणि ISO 10 किंवा kaiOS 2.5.0 पेक्षा जास्त व्हर्जन वापरणाऱ्या युझर्सच्या एन्ड्रॉइड फोनवर Whatsapp सुरळीत सुरू राहणार आहे. याचा अर्थ जुन्या डिव्हाइसवर तुम्ही whatsapp चालवू शकणार नाही. Whatsapp ने आता टू स्टेप व्हेरिफिकेशन, व्हिडीओ कॉल आणि असे बरेच अपडेट्स आणले आहेत. ज्यामुळे युझर्सचा डेटा सुरक्षित राहू शकतो. 


 LG Optimus L5, LG Optimus L7, Motorola Atrix 2, Motorola Droid 4, Motorola Razr V, Samsung Galaxy S Duos, Samsung Galaxy Y Plus, Sony Ericsson Xperia Arc S, Sony Xperia neo L या सारख्या डिव्हाइसमध्ये आज