First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो लहान असो किंवा मोठा, श्रीमंत असो किंवा गरीब त्याच्या हातात तुम्हाला स्मार्टफोन दिसतो. खरंतर इंटरनेटमुळे अनेक गोष्टी आज सोप्या झाल्या आहेत. आज लोक कितीही दूर असले तरी एकमेकांच्या जवळ राहतात. पण एक काळ होतो जेव्हा की व्हिडीओ कॉलसाठी लोकांना सायबरमध्ये जावं लागायचं. जिथे भरमसाठ पैसा आकारला जायचा. (When who and to whom did the first video call and what does video called in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला पहिला व्हिडीओ काल कधी, कुणी आणि कुणाला केला? व्हिडीओ कॉलला मराठी आणि हिंदीत काय म्हणतात माहिती आहे का? 


पहिला व्हिडीओ कॉल कधी झाला?


अनेकांना वाटतं की बाजारात स्मार्टफोन आल्यानंतर व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात झाली. तर आम्ही तुम्हाला सांगतो पहिला व्हिडीओ कॉल हा खूप वर्षांपूर्वी 30 जून 1970 मध्ये करण्यात आला होता. हा पहिला व्हिडीओ कॉल पिट्सबर्गचे महारौर पीटर फ्लेहर्टी आणि अल्कोआचे अध्यक्ष आणि सीईओ जॉन हार्पर यांच्यामध्ये झाला होता. या व्हिडीओ कॉलसाठी Picturephone Mod II नावाचे छोटे उपकरणाचा वापर करण्यात आला होता. 


व्हिडीओ कॉलला मराठी आणि हिंदीत काय नाव?


आजकाल कुठल्याही भाषेतील व्यक्ती असो तो सरसर्कट व्हिडीओ कॉल हा शब्द वापरतो. पण आम्ही जेव्हा गुगलवर याबद्दल शोध घेतल्यावर हिंदी आणि मराठीत व्हिडीओ कॉलला चलचित्र टेलिफोन असं म्हटलं जातं. 
तर चीन, कोरिया आणि जपानमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडीओ कॉलला वेगवेगळं नाव आहे. चिनी भाषेत व्हिडीओ कॉलला  Shipín diànhuà  असं म्हटलं जातं. 


भारतात पहिला मोबाईल कॉल कधी करण्यात आला?


तर भारतात पहिला मोबाईल कॉल हा 31 जुलै 1995 मध्ये करण्यात आला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी कोलकातावरुन दिल्ली संचार भवनात केला होता.



त्यांनी हा मोबाईल कॉल केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना केला होता. यासाठी नोकिया 2110 हा हँडसेटचा वापर केला होता.