अदानी-अंबानी यांचा वर्षभराचा पगारही कमी पडेल; जगातील सर्वात महागड्या कारची किंमत माहितीय का?
Rolls Royce La Rose Noire Droptail: रोल्स-रॉयसच्या या कारतं बॉडी पेंट जवळपास 150 चाचण्या केल्यानंतर निश्चित करण्यात आलं. कारचं डिझाईन Black Baccara गुलाबाच्या पाकळ्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.
World Most Expensive Car: जगात एकापेक्षा एक भन्नाट कार आहेत. यातील काही कार बजेटमध्ये असल्याने लोकांना खरेदी करणं परवडतं, तर काही गाड्या मात्र बजेटमध्ये नसल्याने त्या खरेदी करणं आवाक्याबाहेर असतं. सर्वसामान्य तर या कारचे फोटो पाहण्यापलीकडे काही करु शकत नाहीत. पण तुम्हाला जगातील सर्वात महागडी कार कोणती हे माहिती आहे का? रोल्स-रॉयस ला रोज़ नॉयर ड्रॉपटेल (Rolls-Royce La Rose Noire Droptail) ही जगातील सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत इतकी आहे की, देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा अनेक वर्षांचा पगार कमी पडेल.
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, या कारची किंमत 250 कोटी आहे. या आलिशान कारला ऑगस्ट 2023 मध्ये जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आलं होतं. त्यात आता जर तुम्ही मुकेश अंबानी यांचा पगार किती असा विचार करत असाल तर करोनापर्यंत ते वर्षाला 15 कोटी पगार घेत होते. तसंच अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वर्षाला 9 कोटी पगार घेत होते. आजच्या घडीला दोघांचा एकत्रित पगार 24 कोटी असला तरी कारची एकूण किंमत दोघांच्या एकूण पगारापेक्षा 10 पट जास्त आहे.
Rolls-Royce La Rose Noire Droptail मध्ये असं खास काय?
या रोल्स रॉयस कारमध्ये फक्त दोनच लोक बसू शकतात आणि सुपरकारचा हार्डटॉपही काढता येतो. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, Rolls-Royce La Rose Noire Droptail मध्ये ट्विन-टर्बो 6.75-लिटर, V-12 इंजिन आहे. कारचे इंजिन 563 bhp पॉवर आणि 820 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच कारची बॉडी कार्बन, स्टील आणि ॲल्युमिनियमपासून बनलेली आहे.
150 चाचण्या केल्यानंतर अंतिम झाला बॉडी पेंट
रोल्स रॉयल्सच्या या कारची खास बाब म्हणजे, वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर कारच्या रंगात बदल होत जातो. या कारच्या बॉडी पेंटला जवळपास 150 चाचण्या केल्यानंतर अंतिम करण्यात आलं आहे. कारचं डिझाईन Black Baccara गुलाबाच्या पाकळ्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. या पाकळ्या फ्रान्समध्ये पाहिल्या जातात.