नवी दिल्ली : व्हाट्सअॅपवर पाठवलेले मेसेज आता एका तासानंतरही डिलीट करता येणार. कारण व्हाट्सअॅपच्या डिलीट फॉर एव्हरीवन या फिचरमध्ये अपडेट करण्यात आले आहे.


आता हा होणार फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपडेशनमुळे युजर्सना ४,०९६ सेकंदांनी म्हणजे सुमारे ६८ मिनिटांनीही मेसेज डिलीट करता येतील. यापूर्वी मेसेजेस फक्त ७ मिनीटांच्या आत डिलीट करावे लागत होते.


हे ही होणार अपडेट


WABetaInfo नुसार, हे अपडेशन सध्या व्हाट्सअॅपच्या v2.18.69 बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवर व्हाईस मेसेज लॉकिंग आणि स्टीकर पॅक साईज डिस्प्लेचे देखील अपडेशन लवकरच येईल.


डिलीट फॉर एव्हरीवन


डिलीट फॉर एव्हरीवन हे व्हॉट्सअॅपचे फिचर अगदी वरदानासारखे आहे. त्यामुळे चुकून  पाठवलेला मेसेच तुम्ही सात मिनिटाच्या आत डिलिट करता येत होते. मात्र आता हे फिचर अपडेट झाल्यामुळे ही ७ मिनिटांची वेळेची मर्यादा ६८ मिनिटांवर येऊन  पोहचली आहे.