Anand Mahindra Reply On Scorpio-N: महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ-एन भारतात लाँच केली आहे. महिंद्राच्या या नवीन मॉडेलची लोकं खूप दिवसांपासून वाट पाहत होते. गाडी लाँट झाल्यापासून गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया साइट्सवर अनेक लोक Mahindra Scorpio-N बद्दल बोलत आहेत. लाँचिंगच्या दिवशी 'ScorpioN' ट्रेंडमध्ये होती. यानंतर बुधवारी महिंद्रा स्कॉर्पिओच्या ट्विटर हँडलवरून महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ऑफ-रोडिंगचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ऑल-न्यू स्कॉर्पिओ-एन लहान मुलांच्या खेळाप्रमाणे ऑफ-रोडिंग करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिंद्रा-अँड-महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ते रिट्विट केले आणि लिहिले, "आम्ही तेच करण्यासाठी जन्मलो आहोत". आता यानंतर एका ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांना विचारले की तुम्ही या गाडीचे नाव स्कॉर्पिओ-एन का ठेवले? तुम्ही याला स्कॉर्पियन देखील म्हणू शकला असता. उत्तरात आनंद महिंद्रा म्हणाले- "चांगला प्रश्न. तुम्हाला काय वाटते? योग्य उत्तराच्या सर्वात जवळ कोण येते हे पाहणे मनोरंजक असेल..."



आनंद महिंद्रा यांच्या या उत्तरानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अनेकांनी डोकं लावत उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही लोकांच्या प्रतिक्रियेवर आनंद महिंद्रा यांनीही प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले- "जुनी स्कॉर्पिओ अस्तित्वात असल्याने, N चा अर्थ 'नवीन' असा होऊ शकतो." याला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले- 'तुम्ही योग्य उत्तराच्या अगदी जवळ आहात.'




त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले - "एसयूव्हीच्या बिग डॅडी मधील संभाव्यता घातांक संख्या *n* (अनंत) पर्यंत वाढविली गेली आहे." उत्तरात आनंद महिंद्रा म्हणाले- "होय, हा तर्काचा भाग आहे...".