ATM PIN 4 Digit: एटीएम पिन चार डिजिटचा असण्यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
एटीएमचा वापर आज इतका वाढला आहे की जगात 3.2 दशलक्ष एटीएम आहेत. सर्वाधिक एटीएम चीनमध्ये आहेत.
Why ATM PIN Is 4 Digit Know Reason Behind It: बँकिंग क्षेत्रात झपाट्याने नवनवं तंत्राचा अवलंब केला आहे. त्यामुळे पूर्वी कटकटीचे वाटणारे बँकिंग व्यवहार एका क्लिकवर होत आहेत. इतकंच काय सुट्टीच्या दिवशीही ऑनलाईनमुळे बँकिंग व्यवहार करता येतो. पंतप्रधान जनधन योजनेमुळे जवळपास प्रत्येकाचं बँक खातं आहे. त्या खात्यात सरकारी योजनाचे पैसे जमा होतात. त्यामुळे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. तसेच डिजिटल माध्यमातून देवाणघेवाण होत असल्याने सुट्ट्या पैशांचा प्रश्नही मिटला आहे. दुसरीकडे, ठिकठिकाणी एटीएम मशिन असून एटीएमच्या माध्यमातून रोख काढणं सोपं झालं आहे.
एटीएमचा वापर आज इतका वाढला आहे की जगात 3.2 दशलक्ष एटीएम आहेत. सर्वाधिक एटीएम चीनमध्ये आहेत. तसेच जगातील काही देशांमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी खूप मोठी फी भरावी लागते. तथापि, भारतात, इतर देशांच्या तुलनेत रोख रक्कम काढण्याची किंमत अजूनही खूपच कमी आहे.पण तुम्ही कधी विचार केला आहे का एटीएम पिन नंबर चार अंकीच का असतो. यामागे एक खास कारण आहे, चला तर मग जाणून घेऊयात.
बीबीसीच्या अहवालानुसार, एटीएम मशिनचा शोधकर्ता आणि स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन यांच्या पत्नीमुळे, चार अंकी एटीएम पिन जगभरात एक मानक बनला. शेफर्ड-बॅरॉनला पिन नंबरबद्दल कल्पना सुचली कारण त्याला त्याचा सहा आकड्यांचा सैन्य क्रमांक आठवला. तसेच पिन म्हणून वापरण्याचं ठरवलं. पण यासाठी त्याने एक प्रयोग केला. लोकांना खरंच सहा अंकी क्रमांक लक्षात राहील का? नंबर विसरले तर काय? असे प्रश्न त्यांना पडले.
आपल्या पत्नीला सहा अंक आठवतात की नाही हे पाहण्यासाठी त्याने पत्नी कॅरोलिनाची मदत घेतली. यावेळी स्वयंपाकघरात असलेली त्याची पत्नी म्हणाली की, तिला फक्त चार अंकच आठवत आहेत. यानंतर शेफर्ड-बॅरॉन पिनसाठी चार अंक देण्याचं ठरवलं. हा चार अंकी एटीएम पिन नंबर जगासाठी मानक ठरला.
जगातील पहिले एटीएम उत्तर लंडनमधील एनफिल्ड येथील बार्कलेजच्या शाखेत उभारण्यात आले. ऑन द बसेस या टीव्ही मालिकेतील रेग वार्नी हे एटीएममधून पैसे काढणारे पहिले व्यक्ती होते.