Auto News : अत्याधुनिक कार एखाद्या आविष्काराहून कमी नाहीत. यामध्ये असणारी अनेक उपकरणं, त्यात वापरलं जाणारं तंत्रज्ञान आणि त्यामुळं सुकर होणारी तुमची अनेक कामं पाहताना वेळोवेळी याचा प्रत्यय येत असतो. तुमच्याकडेही एखादी कार आहे का? किंवा येत्या काळात तुम्हीही कार खरेदी करु इच्छिता का? इथं सांगितली जाणारी माहिती लक्षपूर्वक वाचा नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण तुमच्या कारला चोरट्यांपासून मोठा धोका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारमधील सर्वाधिक चोरीला जाणारा हा स्पेअर पार्ट आहे, Catalytic Converter. हे एक असं उपकरण आहे ज्याच्यामुळं कारमधून एक्झॉस्टद्वारे निघणाऱ्या प्रदूषणकारी घटकांना कमी करण्याचं काम करतो. पण, आता मात्र चोरट्यांचा याच यंत्रावर डोळा असल्यामुळं  कार असणाऱ्या अनेकांचीच डोकेदुखी वाढली आहे. 


सध्याच्या घडीला चोरांच्या टोळ्या कारमधील हा स्पेअर पार्ट नेमका का चोरत आहेत यामागचं कारण तुम्हाला कळलं तर, डोकंच चक्रावेल. कॅटालिटीक कन्वर्टरमध्ये प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम असेल अनेक मौल्यवान धातू असतात. ज्यांना चांगली किंमत मिळते. याच कारणामुळं त्याच्या चोरीचं प्रमाण वाढलं आहे. बरं या यंत्राशिवाय कारचंही मोठं नुकसान, त्यामुळं आता कारला नेमकं कसं वाचवायचं हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? पाहा त्यासाठीचे काही सोपे उपाय... 


हेसुद्धा वाचा : पगारवाढ नाहीच! नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आताच निर्णय बदलाल 


अँटी थेफ्ट डिवाईस 


हल्ली काळ इतका पुढे गेला आहे की, अनेक प्रकारच्या लहानसहान यंत्रणांनी मानवी जीवन आणखी सुकर केलं आहे. यामध्येच अँटी थेफ्ट डिवाईसचाही समावेश आहे. या डिवाईसमध्ये कॅटालिटीक कन्वर्टर प्रेटेक्शन शील्डसह एक अलार्म असतो. 


कार सुरक्षित स्थळी पार्क करा 


शक्य असेल तेव्हातेव्हा कार प्रकाश असेल त्याच ठिकाणी पार्क करा. जिथं माणसांची ये-जा आहे अशा ठिकाणी किंवा गॅरेजमध्येही तुम्ही कार पार्क करु शकता. 


बोल्ट्सना वेल्डिंग करा 


कॅटालिटीक कन्वर्टरवर असणाऱे बोल्ट्स अगदी घट्ट करून घ्या. म्हणजे चोरांना इथं चोरी करणं शक्य होणार नाही. 


आणखी एक मार्ग म्हणजे कार पार्क करतानाच ती अशा पद्धतीनं पार्क करा की, कॅटालिटीक कन्वर्टर भींतीच्या दिशेनं असेल. ज्यामुळं चोरांना त्याची चोरीही करता येणार नाही.