Sam Altman Fired: येत्या काळात गुगलनंतर सर्वात मोठी कंपनी ठरण्याची शक्यता असलेल्या ChatGPT च्या मागे असलेल्या OpenAI या कंपनीने सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीचा सॅम ऑल्टमनवरील विश्वास (No Confidence) उडाला असल्याचं कारण देण्यात आलं आहे. बोर्डाने चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर ऑल्टमनची हकालपट्टी (Sam Altman Fired) केली, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅम ऑल्टमन स्वतः ओपन एआयचे सहसंस्थापकांपैकी एक आहेत. चॅटजीपीटीची निर्मिती केल्यानंतर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली होती. स्वत: इलॉन मस्क देखील सॅम ऑल्टमनचे फॅन आहेत.ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती या अंतरिम सीईओ म्हणून काम करतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 


सीईओ सॅम ऑल्टमन यांना कंपनीच्या बोर्डाने काढून टाकल्यानंतर ओपनएआयच्या तीन वरिष्ठ संशोधकांनी राजीनामा दिला आहे. तीन वरिष्ठ ओपनएआय संशोधकांमध्ये जेकब पाचोकी, अलेक्झांडर माद्री आणि सिमोन सिडोर यांचा समावेश आहे. तर ओपनएआयचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनी व्यवस्थापनाच्या फेरबदलाचा एक भाग म्हणून बोर्डाचे अध्यक्षपद सोडलं आहे. 


सॅम ऑल्टमन यांची हकालपट्टी करणारे कोण?


आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे. तर त्यांची देखील हकालपट्टी झाल्याची माहिती समोर आलीये. Quora वेबसाइटचे सीईओ अॅडम डी एंजेलो या बोर्डाचे भाग होते. त्याचबरोबर ताशा मॅकॉली यांचा देखील बोर्डामध्ये सहभाग आहे. यापूर्वी त्यांनी फेलो रोबोट्सची सह-संस्थापना केली होती. इल्या सुत्स्केव्हर सध्या संचालक मंडळावरील एकमेव उर्वरित सह-संस्थापक आहेत. त्यामुळे हा सर्व गेम  इल्या सुत्स्केव्हर यांचा असल्याची चर्चा सुरू आहे.


आणखी वाचा - कार्ड नाही तर 'स्मार्ट रिंग'ने करा पेमेंट, सेकंदात विषय खल्लास; जाणून घ्या किंमत


दरम्यान, हेलन टोनर या सप्टेंबर 2021 रोजी OpenAI च्या संचालक मंडळात सामील झाल्या होत्या. त्यांनी देखील सॅम ऑल्टमनच्या विरुद्ध वोटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या OpenAI च्या ऑफिसमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. एकामागून एक राजीनामे पडत असून मोठमोठ्या कंपन्यांवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.