Disc Brakes Holes: देशात दुचाकींना प्रचंड मागणी आहे. दुसरीकडे स्पर्धा असल्याने कंपन्या बाजारात आपले वर्चस्व राखण्यासाठी ग्राहकांना कमी नफ्यात चांगल्या सुविधा देत आहेत. स्वस्त मोटारसायकलमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस इत्यादी जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये देखील देत आहेत. डिस्क ब्रेक आणि एबीएस सारखी वैशिष्ट्ये यापूर्वी महागड्या किंवा स्पोर्ट्स बाइकमध्येच उपलब्ध होती. पण आता स्वस्त बाइकसोबतच स्कूटरमध्येही ही सुविधा दिली जात आहे. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का?  टू-व्हीलरमध्ये बसवलेल्या डिस्क ब्रेकला छिद्र का असतात?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाइकच्या डिस्क ब्रेकला छिद्र असणं खूप गरजेचं आहे. याचे एक नाही तर दोन मोठे फायदे आहेत जे तुमच्या सुरक्षिततेसाठी तसेच तुमच्या बाइकसाठी खूप महत्वाचे आहेत. डिस्क ब्रेक प्लेट ही डिस्क पॅडच्या आतून दोन्ही बाजूंनी झाकून ठेवते. जेव्हा तुम्ही बाइक चालवताना ब्रेक लावता तेव्हा डिस्क पॅड डिस्क प्लेटला दोन्ही बाजूंनी घासून जोरात दाबते, त्यामुळे तुमची मोटरसायकल थांबते. जरी तुम्ही ब्रेक लावला नाही तरी ही डिस्क प्लेट डिस्क पॅड्समध्ये खूप वेगाने घासत असते. जर तुम्ही डिस्कला स्पर्श केला तर तुम्हाला चटका बसेल.


डिस्क ब्रेक प्लेटमधील छिद्रे महत्त्वाचं कार्य करते. कारण डिस्क पॅडला घासून चकती गरम होते. त्यामुळे ज्यादा गरम झाल्याने चकती तुटू शकते.  जर बाइकच्या डिस्क ब्रेकमध्ये छिद्र असल्याने उष्णता वेगाने बाहेर पडते. जर ही छिद्र नसती तर चकती गरम होऊन तुटेल आणि मोठा अपघात होऊ शकतो.


Maruti च्या 'या' गाड्यांमध्ये सीट बेल्टचा Problem! 5002 युनिट्स परत मागवले, तुमची कार यात नाही ना


दुसरीकडे, पावसात गाडी चालवताना ब्रेक लावताना अडचण येत नाही आणि बाइक आरामात जागेवर थांबते. डिस्क ब्रेकवर वारंवार पाणी पडल्याने या छिद्रातून बाहेर पडते. जर छिद्र नसती तर पाणी डिस्कवरच जमा राहिलं असतं आणि रबराने बनलेल्या डिस्क पॅडच्या पकडीत आली नसती. म्हणजेच ब्रेक लागणार नाही. 


डिस्क ब्रेक प्लेटमधील छिद्र दोन प्रमुख कार्ये करतात. डिस्क प्लेटची उष्णता मेटेंन ठेवत, त्याचबरोबर डिस्क पॅड कोरडी ठेवण्यास देखील मदत करते.